मुंबई : ( Jalgaon WhatsApp Crime) जळगावमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नीलेश हेमराज सराफ ( Nilesh Hemraj Saraf ) या व्यावसायिकाला व्हॉट्सअॅप सेटिंग ‘ऑटो डाऊनलोड’ ( Auto Download ) वर ठेवण भलतंच महागात पडलयं. त्यांच्या खात्यातून तब्बल ४ लाख ६४ हजार रुपये गायब झाल्याची माहिती मिळाली आहे. या संबंधात नीलेश हेमराज सराफ यांनी सायबर पोलिसात तक्रार दाखल केली असून, पोलिसांकडून आता या घटनेचा शोध घेतला झात आहे.
हेही वाचा : Ghatkopar Fire Update : घाटकोपरच्या 'गोल्डक्रेस्ट बिझनेस पार्क' इमारतीला आग! आगीचं कारण अद्याप अस्पष्ट
माध्यमांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, ४९ वर्षीय व्यावसायिक नीलेश हेमराज सराफ ( Nilesh Hemraj Saraf ) यांच्या व्हॉट्सअॅपवर एका अनोळखी नंबरवरून 'कस्टमर्स सर्व्हिस सपोर्ट' या नावाची ‘एपीके’ ( APK ) फाइल आली. त्यावेळी त्यांचा व्हॉट्सअॅप ऑटो डाऊनलोड सेटिंगवर असल्यामुळे फाइल ऑटोमॅटिक डाऊनलोड झाली आणि दुसऱ्याच क्षणी त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ४ लाख ६४ हजार रुपये गायब झाले.
हे वाचलात का? : नोबेल नाहीच; मात्र ट्रम्प यांना दिला जाणार इस्त्रायलचा सर्वोच्च नागरी पुरस्कार!
सराफ यांचे व्हॉट्सअॅप ( WhatsApp )ऑटो डाऊनलोडवर असल्यामुळे एपीके फाइल ऑटोमॅटिक डाऊनलोड झाली. ज्यामुळे अज्ञात गुन्हेगाराला सराफ यांच्या फोनचा अॅक्सेस मिळाला आणि त्यांची खाजगी माहिती मिळवणे सहज सोपे झाले. खात्यातुन पैसे काढले जात असल्याचे लक्षात येताच सराफ यांनी त्यांचे बँक खाते होल्ड केले.
या प्रकरणाचा शोध सायबर पोलिसांकडून घेतला जात आहे. मात्र अशा घटना घडू नये यासाठी नागरिकांनी देखील काळजी घेणे आवश्यक आहे. दरम्यान सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश गोराडे ( Satish Gorade ) यांनी अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.