नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण प्रवेश परीक्षा पुन्हा – १७ ऑक्टोबरला आयोजित

13 Oct 2025 17:15:52



 
Civil Services Pre-Training Entrance Exam


मुंबई : ( Civil Services Pre-Training Entrance Exam ) महाराष्ट्र शासनाच्या सर्वंकष धोरणानुसार सन २०२५–२६ करिता बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती व आर्टी या संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाची सामायिक प्रवेश परीक्षा पुन्हा आयोजित करण्यात येत आहे.
 
हेही वाचा :नोबेल नाहीच; मात्र ट्रम्प यांना दिला जाणार इस्त्रायलचा सर्वोच्च नागरी पुरस्कार!

याआधी ही परीक्षा सोमवार, दि. २९ सप्टेंबर व मंगळवार, दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी घेण्यात आली होती. परंतु पूरसदृश्य परिस्थितीमुळे काही विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे बार्टी, पुणे यांच्या संकेतस्थळावर २८ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या घोषणेनुसार अनुपस्थित विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा १७ ऑक्टोबर २०२५ रोजी पुन्हा घेण्यात येणार आहे.

बार्टी, पुणे यांनी स्पष्ट केले आहे की या परीक्षेसाठी प्रवेशपत्र ऑनलाईन अर्ज भरलेल्या पोर्टलवर उपलब्ध करून दिले जातील. उमेदवारांनी परीक्षेबाबतची माहिती वेळेवर नोंद घेऊन तयारी करावी.

हे वाचलत का ? - जमात-उल-मुमिनात : दहशतवादविरोधी लढ्यापुढचे नवे आव्हान


सूचना बार्टीच्या अधिकृत घोषणेनुसार असून, परीक्षेसंबंधित सर्व अपडेट्स संकेतस्थळावर नियमित तपासणे आवश्यक आहे, असे महासंचालक सुनील वारे यांनी आवाहन केले आहे.
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0