नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागामार्फत लोककल्याण मेळाव्याचे यशस्वी आयोजन

    12-Oct-2025
Total Views |

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील फेरीवाले यांच्यासाठी समाजविकास विभागाच्या वतीने तुर्भे विभाग कार्यालयात आयोजित करण्यात आलेला पीएम स्वनिधी अंतर्गत लोककल्याण मेळावा यशस्वी रितीने संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाचे उपसचिव डॉ. पराग गवळी, स्मॉल इंडस्ट्रिज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक राजेश कुमार, नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे सहआयुक्त शंकर गोरे, नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या उपआयुक्त प्रणाली घोंगे, पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी नानासाहेब कामटे तसेच नमुंमपा समाजविकास विभाग उपआयुक्त नयना ससाणे, समाजविकास अधिकारी प्रकाश कांबळे आणि राष्ट्रीय शहरी उपजिवीका अभियानाचे (NULM) राज्य अभियान व्यवस्थापक उपस्थित होते.

यावेळी उपस्थित फेरीवाले यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच त्यांना येत असलेल्या अडचणी सांगितल्या. यावेळी अर्ज भरताना येणा-या अडचणीं बाबत आढावा घेण्यात आला. याप्रसंगी पीएम स्वनिधी अंतर्गत रुपये 10 हजार, 20 हजार व 50 हजार रक्कमेच्या कर्जासाठी अर्ज दाखल करण्यात आले, तसेच ‘स्वनिधी से समृद्धी’ अंतर्गत फेरीवाल्यांचे प्रोफाईलींग करण्यात आले. या उपक्रमामध्ये 172 लाभार्थी यांनी सहभागी होऊन लाभ घेतला.