राज्यात भाजपासाठी उत्साहाचे वातावरण : मुख्यमंत्री फडणवीस

    12-Oct-2025
Total Views |

पुणे : 'राज्यात भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने सकारात्मक आणि उत्साहाचे वातावरण आहे. युती संदर्भात आढावा घेतला जात आहे. शक्य असेल तिथे युतीचा प्रयत्न झाला पाहिजे अशा सूचना आहेत.' अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.


पुण्यात पश्चिम महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्था नियोजन बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी माध्यमांशी ते बोलत होते.


शहराध्यक्ष धीरज घाटे, हवाई उड्डाण राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, तंत्र व उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सामाजिक न्याय व अल्प संख्यांक राज्य मंत्री माधुरी मिसाळ, पश्चिम महाराष्ट्रातील आमदार, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ' काही ठिकाणी युती झाली नाही तरी मित्र पक्षावर कोणीही टीका टिपण्णी करणार नाही असे ठरवण्यात आले आहे. कोणीच कोणावर वयक्तिक टीका करू नये असे स्पष्ट सांगण्यात आले आहे.'


'शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी जास्तीत जास्त मदत पुरवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना मदत मिळायला सुरुवात झाली आहे. सरकार कोणालाही रस्त्यावर उतरू देणार नाही.' अशी माहिती फडणवीस यांनी दिली.


घायवळ संदर्भात पासपोर्ट कधी मिळाला हे बघायला हवे. ह्या प्रकाराची सुरुवात कुठून झाली ह्यावरून दबाव कोणाचा आहे हे बघायला पाहिजे. ते तिथे रहात नसताना पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली अहवाल दिला हे तपासायला हवे. ज्यांनी चुकीचा अहवाल दिला त्यांची चौकशी केली जाईल. असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.