रहिवासी भागातील एका गाल्यातून बेकायदा फटाक्यांचा साठा जप्त

    12-Oct-2025
Total Views |

उल्हासनगर : उल्हासनगर शहरातील गांधी मार्केट परिसरातील मोनिका हॉल जवळील रहिवासी परिसरात एका गाल्यात बेकादेशीर रित्या फटाक्याचा साठा ठेवल्या असल्याची माहिती ११२ नंबरचा कॉल करून एका समाजसेविका महिलेने पोलिसांना दिली. या घटनेची तात्काळ पोलिसांनी दखल घेत त्या ठिकाणी छापा टाकला. पोलिसांनी त्या गाळ्यातून ३ लाख ३३ हजार रुपये किमतीचे विविध फटाके जप्त केले आहेत.

तो गाळा एका उमेश वधारिया या नावाच्या इसमाच्या असल्याचे पोलिसांना समजले आहे. ज्या ठिकाणी त्या फटाक्याचा साठा ठेवण्यात आला होता त्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याचे ही आढळून आले आहे. पोलिसांनी त्या फटाक्याचा साठा जप्त करून तो गाळा सील करून गुन्हा दाखल केला आहे.

या परिसरात अशा अनेक बेकायदा फटाक्यांच्या साठ्यांचा व्यापार सुरू असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली असून त्यांनी पोलिसांकडून अधिक कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आले आहे की अशा धकादायक व बेकायदा साठे यांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी जेणेकरून कोणती संभाव्य दुर्घटना टाळता येईल.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी माहिती देत सांगितले की आम्हाला याबाबत एका सेविकेकडून माहिती मिळाली की एका गाल्यातमध्ये बेकादेशीर रित्या मोठ्या प्रमाणात फटाक्याचा साठा ठेवलेला असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरून आम्ही त्या ठिकाणी छापा टाकला. त्या ठिकाणावरून तीन लाख ३३ हजार रुपयांचा फटाक्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारच्या सुरक्षितेचे उपयोजना करण्यात आली नव्हती त्यामुळे आम्ही त्यांच्यावर कारवाई केली आहे.

उल्हासनगर शहरातील नागरिकांना व फटाक्याच्या दुकानदारांना आव्हान केले की ज्या ठिकाणी आपल्याला परवानगी दिली आहे त्या ठिकाणीच फटाके विक्रीसाठी ठेवा. त्यामुळे नागरिकांच्या जीवितेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सावधगिरी बाळगा. कायद्याचा उल्लंघन केल्यास आपल्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असाही इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी दिला आहे.