सलग दुसऱ्या दिवशीही मेट्रो ३ची प्रवासी संख्या लाखात!

11 Oct 2025 13:24:31

मुंबई : आरे जेव्हीएलआर ते कफ परेड या मुंबई मेट्रो ३ ला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पहिल्याच दिवशी दिसले. मात्र, आपला लाखो प्रवासी संख्येचा आकडा सलग दुसऱ्या दिवशीही काम असल्याचे चित्र शुक्रवार, दि. १० रोजी पाहायला मिळाले. मेट्रो ३ प्रवासाचा अनुभव सुखद आणि जलद असल्याने आता सीएसएमटी आणि चर्चगेट स्थानकावरून अंधेरी, घाटकोपरकडे जाणाऱ्यांनी मेट्रो ३ ची वाट धरल्याचे चित्र पाहायला मिळाले.

संध्याकाळी गर्दीच्या वेळी सीएसएमटी, चर्चगेट, दादर, महालक्ष्मी, ग्रांट रोड या स्थानकांवर चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी असल्याचे दिसून आले. तसेच, यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांनीही मोकळा श्वास घेतल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून कांजूरमार्ग असा प्रवास करणाऱ्या ३५ वर्षीय पूजा मढवी यांनी सांगितले की, आज सीएसएमटीवरून आम्ही काम संपवून ट्रेनमध्ये चढलो,तेव्हा रोजच्या तुलनेत गर्दी कमी आहे असे जाणवले.

आमच्या कार्यालयात काम करणाऱ्या अनेकांनी मेट्रो ३ने आणि पुढे पुन्हा बदलून मेट्रो १ने प्रवास करणे पसंत केले. कारण त्यांना काल ते जास्त सोयीस्कर वाटले आणि वेळही वाचला असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. तसेच, आज दादरला देखील उतरणाऱ्यांची फार गर्दी नव्हती. त्यामुळे ज्यांना ट्रेनमध्ये चढायचे आहे. ते त्यांना सोपे झाले. महा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार,दि.१० रोजी सकाळी ६ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत १ लाख ११ हजार ६९६ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. (Update Will be On 9PM) तर पहिल्या दिवशी गुरुवार, दि.९ रोजी रात्री साडेदहा पर्यंत १ लाख ५६ हजार ४५६ इतक्या प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. या संपूर्ण मार्गात पीक अवर्स मध्ये सर्वाधिक प्रवासी हे विधानभवन, चर्चगेट आणि सीएसएमटी स्थानकात असल्याचे पाहायला मिळाले.

काल मी दादर सिद्धिविनायक मंदिर मेट्रो स्थानक ते काळबादेवी असा मेट्रो ३ ने प्रवास केला. अतिशय कमी खर्च आणि एकदम झकास असा प्रवास झाला. आज मी कामानिमित्त दादर लोकल स्थानकावर आलो आणि त्यानंतर माझे महालक्ष्मी स्थाकावरही जाणे झाले. आज चक्क संध्याकाळी ७ वाजले तरी प्लॅटफॉर्मवर गर्दी नव्हती. रोजच्या तुलनेत गर्दी कमी असल्याने आणि उतरणारे कमी असल्याने ज्यांना लांब प्रवास करत जायचा आहे त्यांना चढणे सोपे झाले. आज ट्रेनमध्येही गर्दी कमी असल्याचे दिसून आले.
- कमलाकर डिचवलकर, प्रवासी



Powered By Sangraha 9.0