
डोंबिवली : राज्याच्या विविध भागात आलेल्या पूरपरिस्थितीने पिकांच्या हानी बरोबर नागरी जीवन उध्दवस्त केले, अशा पुराच्या फटका बसलेल्या भागाला आर्थिक, वस्तु रूपाने डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे मदत करण्यात येणार आहे. तरीही शहर परिसरातील नागरिकांनी आर्थिक वा वस्तुरुपाने या आपत्कलीन निवारण निधीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन श्री गणेश मंदिर संस्थानने केले आहे. हा आपत्कालीन निवारण निधी राज्याच्या विविध भागातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना योग्य नियोजन करून वाटप केला जाणार आहे.
त्यामुळे या निधी संकलन, वस्तू भेट उपक्रमात नागरिकांनी अधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंदिर संस्थानने केले आहे. नागरिकांनी आपले मदतीचे धनादेशा श्री गणेश मंदिर संस्थान नावाने काढायचे आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी गणेश मंदिर संस्थान, प्र. के. अत्रे वाचानलय, गणेश वैद्यकीय सुविधा केंद्र, श्री मारूती मंदिर येथे नागरिकांच्या मार्गदर्शन आणि संकलनासाठी कक्ष उभारण्यात आले आहेत. धनादेशाची पावती मदतदात्यांना देण्यात येणार आहे. गणेश मंदिरात सकाळी आठ ते दुपारी दीड आणि दुपारी तीन ते रात्री आठ वेळेत निधी संकलन केले जाणार असल्याचे संस्थांनकडून सांगण्यात आले.