ईशान्य भारताच्या परिवर्तनाचा प्रवास

    01-Oct-2025
Total Views |

ईशान्य भारत, जो निसर्ग सौंदर्य, सांस्कृतिक वैविध्य आणि खनिज संपत्त्यांनी भरलेला आहे, त्याची राजकीय अनास्था आणि भौगोलिक दुर्गमता यामुळे देशाच्या मुख्य प्रवाहापासून वेगळे राहिले होते. इथल्या जनजातींच्या संस्कृतीला ओळखून, विविध संस्थांनी या प्रदेशात आपले कार्य सुरू केले, परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगदान हे विशेष महत्त्वाचे ठरले. संघाच्या स्वयंसेवकांनी या भागात प्रवेश केला, तेव्हा शिक्षण, आरोग्य, व महिलांच्या स्वावलंबनासाठी अनेक योजना सुरू करण्यात आल्या. या लेखात, संघाच्या या कार्याचा तपशीलवार मागोवा घेत, कशा प्रकारे ईशान्य भारतातील जनजातींचे, तरुणाईचे जीवनमान बदलले आणि त्यांचे समाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक स्थान उंचावले, याचा साक्षात्कार होईल.

सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालॅण्ड, त्रिपुरा, मणिपूर व मिझोराम राज्ये म्हणजे ईशान्य भारत. निसर्ग सौंदर्य व खनिजसंपत्तीने समृद्ध असलेला हा भाग राजकीय अनास्था व भौगोलिक दुर्गमतेमुळे राष्ट्रीय प्रवाहापासून बाजूला पडला होता. भाषा, वेशभूषा, आहार, विहार, पूजापद्धती शारीरिक ठेवण यांबाबत वैविध्य असलेल्या ईशान्य भारताविषयी देशाच्या उर्वरित भागात अज्ञान व गैरसमजच जास्त होते व आजही आहेत. याचा गैरफायदा घेऊन ख्रिश्चन मिशनरींनी तेथील नागरिकांचे धर्मांतर सुरू केले होते व राष्ट्रविरोधी शक्तींनी फुटीरतेला खतपाणी घालून तो भाग देशापासून तोडण्याची कारस्थाने रचली होती. ईशान्य भारताच्या सीमा चीन, बांगलादेश, म्यानमार व नेपाळ या देशांना लागून असल्याने या भागाचे आंतरराष्ट्रीय भूराजकीय महत्त्व अनन्यसाधारण आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 1950 पूवच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ईशान्य भारतात काम सुरू केले होते. नंतर संघ परिवारातील ‌‘जनजाती/वनवासी कल्याण आश्रम‌’, ‌‘अखिल भारतीय विद्याथ परिषद‌’ व विवेकानंद केंद्राच्या कार्यकर्त्यांनी ईशान्य भारतात काम सुरू केले. संघाचे हे काम सुरुवातीला मु‌‘यत्वे ईशान्य भारतातील मैदानी प्रदेशात होते. ईशान्य भारताच्या डोंगराळ प्रदेशात 145 जनजाती आहेत. डोंगराळ प्रदेशातील जनजातींची लोकसं‌‘या ईशान्य भारताच्या एकूण लोकसं‌‘येच्या 43.5 टक्के इतकी आहे. या डोंगराळ प्रदेशातल्या जनजातींच्या लोकसं‌‘येचे प्रमाण मिझोराम 95 टक्के, नागालॅण्ड 89 टक्के, मेघालय 86 टक्के, अरुणाचल प्रदेश 64 टक्के इतके जास्त आहे. अरुणाचल प्रदेश वगळता, सर्वच राज्यांतील डोंगराळ भागांत त्यांचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर झाले आहे. धर्मांतरित न झालेले लोक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा जनजातींच्या रूढी, परंपरा व पूजापद्धती पाळतात.

ईशान्य भारताचे उर्वरित भारताशी नाते अभंग ठेवण्याच्या दृष्टीने जनजातींमध्ये डोंगराळ प्रदेशातील जनजातींमध्ये काम वाढवण्याचा निर्णय 1991च्या प्रतिनिधी सभेत घेण्यात आला. संघरचनेतील सक्षम प्रांतांनी ईशान्य भारतातील राज्ये दत्तक घ्यावीत, असे ठरले. त्यानुसार मेघालय, नागालॅण्ड, मिझोराम या राज्यांमध्ये प्रचारक, निधी व साहित्य पुरवण्याची जबाबदारी महाराष्ट्राने घेतली. त्यावेळी माननीय मुकुंदराव पळशीकर महाराष्ट्राचे प्रांत प्रचारक होते. महाराष्ट्रातून तीनही राज्यांत प्रचारक गेले. ते तेथील जनजातींच्या बोलीभाषा शिकले. त्यांनी स्थानिक शाळांमध्ये शिक्षक म्हणून काम सुरू केले.

‌‘जनजाती/वनवासी कल्याण आश्रमा‌’च्या माध्यमातून मेघालय व नागालॅण्डमधून लहान विद्याथ-विद्यार्थिनी बिहार उत्तर प्रदेश उत्तराखंड व हरियाणा येथे जात होती. त्याच पद्धतीत मेघालयातील खासियत या मुलांना महाराष्ट्रात शिक्षणासाठी आणण्याची योजना तयार झाली. त्यानुसार 1995 मध्ये एक सदनिका घेऊन मेघालयातील काही मुलांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली. शिक्षण मंदिर इंग‌‘जी माध्यमाच्या शाळेत त्यांचा प्रवेश घेतला. उन्हाळ्याच्या सुटीत ही मुले पालकांना व स्थानिक गावकऱ्यांना मुलांमधील चांगले बदल जाणवले. त्यामुळे अन्य पालकही मुलांना महाराष्ट्रात पाठविण्यास तयार झाले. त्यामुळे आणखी नवीन मुले महाराष्ट्रात आली.

त्यातील काहींना पुण्यात ठेवण्यात आले व यातील 13 मुले लातूरच्या जनकल्याण निवासी विद्यालयात अन्य मुलांसोबत राहू लागली. लातूरमध्ये ही मुले बसवण्णाप्पावाले इंग‌‘जी माध्यमाच्या शाळेत शिकू लागली. या कामाला संस्थात्मक रूप देण्यासाठी हा प्रकल्प ‌‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती‌’ (महाराष्ट्र प्रांत)ला जोडण्यात आला. त्याला ‌‘पूर्वांचल विकास विभाग‌’ असे नाव देण्यात आले. ा विभागाचे सर्व काम जनकल्याणमध्ये निधी जमा करून सुरू झाले. याच काळात ‌‘भारत मेरा घर‌’ नावाचा उपक‌‘मही सुरू केला. या उपक‌‘मांतर्गत मेघालयातील गावांचे प्रमुख, शिक्षक, वकील, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते व जनजातींचे पुजारी अशांना संघाच्या कामाची ओळख व्हावी, म्हणून महाराष्ट्रात आणून संघाचे विविध प्रकल्प दाखवले गेले. महाराष्ट्रातून संघ कार्यकर्त्यांना ईशान्य भारतातील प्रदेश, आपल्या प्रचारकांनी सुरू केलेले काम व तिथे असलेली कामाची गरज दाखवण्यासाठी नेले जाऊ लागले.

‌‘भारत मेरा घर‌’च्या योजनेतून एप्रिल 1998 साली पाचगणीचे डॉक्टर देशपांडे व सांगलीचे डॉक्टर केळकर गेले. त्या दोघांनाही या कामाची गरज इतकी जाणवली की, त्यानंतर जून 1998 साली डॉक्टर देशपांडे व सौ. देशपांडे मेघालयात गेले. डॉक्टर देशपांडे ांनी मोखला येथे दोन वर्षे दवाखाना चालवला. त्यानंतर डॉक्टर केळकरांनी तोच दवाखाना पाच वर्षे चालवला. असेच शैला देशपांडे ईशान्य भारतात फिरायला गेलेल्या असताना त्यांनीही तिथल्या प्रचाराकांची भेट घेतली व त्यांनाही तेथील कामाची गरज समजली. तेथील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी स्वेटर विणायला शिकवायचे ठरले. त्यासाठी शैला ांनी पहिल्यांदा स्वतः स्वेटर विणण्याचे प्रशिक्षण घेतले व त्यांनी चार वर्षे मेघालयात व एक वर्ष नागालॅण्डमध्ये स्वेटर बनवण्याचे महिलांना प्रशिक्षण दिले.

तसेच, ‌‘भारत मेरा घर‌’ योजनेतून ईशान्य भारतातून महाराष्ट्रात व गोव्यात आलेल्या लोकांनी जेव्हा येथील रक्तपेढ्या, सहकारी बँका, अपंगांसाठी चालवल्या जाणाऱ्या संस्था आणि छत्रपती संभाजीनगरमधील अत्यंत अद्ययावत असे हेडगेवार रुग्णालय बघितले, तेव्हा त्यांना त्यांनीही अशाच संस्था ईशान्य भारतात संघाच्या मदतीतून उभ्या कराव्यात, अशी प्रेरणा मिळाली. त्यातून सेवा भारती मेघालय, सेवा भारती पूर्वांचल अशा संस्था उभ्या राहिल्या, सेवा भारती मेघालयासाठी स्थानिक जनजातींमधून कार्यकर्ते पुढे आले. या संस्था उभ्या करून आज 25 वर्षे झाली, तरी या सर्व व्यक्ती आजही संस्थांचे कि‌‘याशील कार्यकर्ते आहेत.

पुणे व लातूर येथे छात्रावास सुरू झाल्यानंतर नाशिकला मुलींचा व छत्रपती संभाजीनगर येथे मुलांचे छात्रावास सुरू केले. चारही छात्रवासात मेघालयातील खासी व जयंती या भागातील विद्याथ-विद्यार्थिनी होते. त्यानंतर मेघालयातील गारो भागातील व नागालॅण्डमधील विद्याथ-विद्यार्थिनी महाराष्ट्रात आणले. मेघालय नागालॅण्ड या दोन्ही राज्यातल्या विद्याथ व विद्यार्थिनींचे छात्रावास महाराष्ट्रात सुरू झाले. सत्तरच्या दशकात शंकर काणे उर्फ भैय्याजी काणे या संघाच्या कार्यकर्त्यांनी पूजनीय गुरुजींच्या आदेशानुसार मणिपूरमधील ख्रिश्चनबहुल असलेल्या डोंगराळ भागात शिक्षकी पेशा स्वीकारून काम सुरू केले. त्यावेळी त्यांनी अनेक विद्याथ शिकण्यासाठी महाराष्ट्रात व कर्नाटकात आणले. ते वारल्यानंतर त्यांच्या विद्यार्थ्यांनी मुकुंदराव पणशीकरांना मणिपूरमधील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रात छात्रावास सुरू करण्याची विनंती केली. त्यानुसार मणिपूरच्या विद्यार्थ्यांचेही छात्रावास सुरू झाले.

तसेच भैय्याजी काणेंनी ज्या भागात काम केले, त्या भागांमध्ये भैय्याजींच्या नावाने शाळा सुरू कराव्यात अशीही मागणी केली. त्यानुसार पहिल्यांदा खारसोम येथे गावकऱ्यांनी शाळेसाठी जमीन देऊ केली. हा भाग 100 टक्के ख्रिश्चन झालेला आहे. तरीही त्यांना हिंदू संस्कार करणारी शाळा तिथे हवी होती. आज मणिपूरमध्ये खारासोम, तमेनलांग, चुडाचांदपूर तीन ठिकाणी महाराष्ट्रात नोंदणी केलेल्या ‌‘पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान‌’ संस्थेतर्फे शाळा भैय्याजी काणेंच्या नावाने शाळा चालवल्या जातात. शाळा पूर्णपणे 100 टक्के ख्रिश्चन असलेल्या भागात चालवूनसुद्धा येथे पालकांचा जास्त कल त्यांच्या पाल्यांना आपल्या शाळेत घालण्याकडे आहे. मागच्या वष मणिपूरमधील कुकी व मैतेयी झालेल्या यांच्यामध्ये झालेल्या संघर्षाचा मु‌‘य भाग असलेल्या चुडाचांदपूर येथे आपली शाळा बंद झाली नाही. इतकेच नाही, तर दि. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे झेंडावंदनही कुकी दहशतवाद्यांच्या दबावाला बळी न पडता व्यवस्थित झाले.

अशा तऱ्हेने रत्नागिरी, चिपळूण, डोंबिवली, सांगली, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, परभणी, आंबेजोगाई या सर्व ठिकाणी छात्रावास सुरू झाले. पुढे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी म्हणून अजून काही छात्रावास सुरू झाले. या पद्धतीत महाराष्ट्रभर छात्रावासांचे जाळे निर्माण झाले. एक छात्रावास पणजीमध्येपण होता. असे अनेक छात्रावास सुरू करण्यामागे मुकुंदराव पळशीकरांचा ईशान्य भारताची माहिती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचावी हा उद्देश होता.

ईशान्य भारताची माहिती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचावी, ाच उद्देशातून मुकुंदराव पळशीकरांनी तेव्हाचे मेघालयातील प्रचारक सुनील देवधर यांना एक वर्षभर महाराष्ट्रात बोलावले व त्यांच्या ईशान्य भारताबद्दलच्या भाषणांचे महाराष्ट्रभर नियोजन केले. ती भाषणे ऐकून पुढे या विषयात बोलणारे अनेक कार्यकर्ते वक्ते झाले. तसेच, अनेक तरुण ईशान्य भारतासाठी एक-दोन वर्षे देण्यासाठी तयार झाले. त्यांनीही ईशान्य भारतात जाऊन चांगले काम केले. छत्रपती संभाजीनगरमधील हेडगेवार रुग्णालयाच्या डॉक्टरांनी गारोपहाडात तीन वर्षे, तीन-तीन महिने जाऊन दवाखाना चालवला.

ज्या शहरात छात्रावास चालत होते, त्या शहरांमध्े विद्याथ-विद्यार्थिनींचे दिवाळीमध्ये शिबिराचे नियोजन केले. या शिबिरातील शोभायात्रा व सार्वजनिक समारोपांमुळे त्या शहरात ईशान्य भारताची माहिती सर्वदूर पसरत असे. संघाचे विरोधकसुद्धा राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेमुळे कामाकडे ओढले जाऊ लागले.पुढे नियोजनात काही अडचणी आल्यामुळे या छात्रावासांची सं‌‘या आठ अशी केली गेली. आज चिंचवड, पुणे, रत्नागिरी, डोंबिवली, सांगली, नाशिक, लातूर व छत्रपती संभाजीनगर येथे छात्रावास चालू आहेत.छात्रावासातील माजी विद्याथ-विद्यार्थिनी पूर्वांचलामध्ये विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. ते समाजव्यवस्थेत सकारात्मक बदलांसाठी प्रयत्नशील आहेत.पुण्यातल्या पहिल्या विद्यार्थ्यांमधला मद्रास डखार हा आज नाबार्डमध्ये मॅनेजर आहे. तो आपल्या उत्पन्नातून काही मुलींच्या शिक्षणाचा खर्च करतो.

नाशिकमधील पहिल्या विद्यार्थिनींमधल्या डेलिना खोंगडुप हिने ‌‘एलएलएम‌’ केले. तिने स्वतःचा वकिली पेशा सांभाळून सामाजिक कार्य सुरू केले. तिने महिलांचे ‌‘स्वयंसाहाय्यता‌’ गट सुरू केले. महिलांसाठी शिवण क्लास काढला. आता तर ती तिच्या कर्तृत्वाने राष्ट्रीय महिला आयोगाची आतापर्यंत झालेल्या सर्व सदस्यांमध्ये सर्वांत लहान वयाची अशी सदस्य आहे. डेलिनाच्या बरोबरची आयुंक्सीयार सदाम ‌‘एमबीबीएस‌’ झाली. ती सध्या मेघालयातल्या पेनर्सुला येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात दहा वर्षांहून जास्त वर्षे मेडिकल ऑफिसर म्हणून काम करते. ती तिथे सर्वांत चांगली डॉक्टर म्हणून वाखाणली जाते.

लातूरमध्ये आलेल्या पहिल्या विद्यार्थ्यांमधल्या रीबान सिंगने स्वतः बारावी विज्ञान केल्यावर गावातल्या शाळेत शिक्षक म्हणून काम सुरू केले. हे करत असतानाच त्याने ‘बीएससी‌’, ‌‘बीएड‌’, ‌‘एमएससी‌’ केले. शाळेसाठी एशियन बँकेकडून मदत मिळवली. शाळेचा खूप विकास केला. आजूबाजूच्या गावातील विद्याथ शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून, शाळेला जोडून मुलांसाठी व मुलींसाठी वेगवेगळे छात्रावास सुरू केले. यासोबत ख्रिश्चनांनी जेव्हा तेथील बाजार रविवारी बंद करायला सांगितले, तेव्हा त्याने त्याविरुद्ध जनआंदोलन उभे करून रविवारचा बाजार चालू ठेवला.

मद्रास, डेलिना, शैलेंद्र लासो व जनजातीतील तरुण संघ कार्यकर्ते मांकाशांग, सेशान सर्वांनी एकत्र येऊन तिथे एक शैक्षणिक संस्था स्थापन केली. ज्या भागात विज्ञान शाखेच्या शिक्षणाची सोय नव्हती, तिथे अकरावी-बारावीचे वर्ग व त्याला जोडून छात्रावास सुरू केले.
पुण्यातल्या पहिल्या विद्यार्थ्यांमधला सुखलांग डखार पुण्यामध्ये मेडिकल ट्रान्स्कि‌‘पशन शिकला. त्याने परत शिलाँगला जाऊन काम सुरू केले. काम करता करता, त्याने अनेक लोकांना मेडिकल ट्रान्स्कि‌‘पशन शिकवले व रोजगार मिळवून दिला.

सुखलांग पुण्यात शाळेत असताना त्याने रोलर स्केटिंग शिकले होते. व्यवसायाबरोबर शिलाँगमध्ये त्याने रोलर स्केटिंग क्लब सुरू करून मुलांना रोलर स्केटिंग शिकवायला सुरुवात केली. रोलर स्केटिंगमध्ये पुण्यातील राजू दाभाडे यांनी ‌‘नवीन रोलर बॉल स्केटिंग‌’ नावाचा खेळ सुरू केला. सुखलांग त्यांचा विद्याथ त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुखलांगने रोलर बॉल स्केटिंगचा संघ तयार केला. मागच्या वष रोलर बॉल स्केटिंगच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या वेळी सुखलांग भारतीय संघाचा मॅनेजर होता. ज्या मेघालयात 25 वर्षांपूव 15 ऑगस्ट, 26 जानेवारी हे राष्ट्रीय सण ‌‘काळे दिवस‌’ म्हणून पाळले जात व सर्वत्र शुकशुकाट असे त्याच मेघालयाच्या राजधानी शिलाँगमध्ये आज राष्ट्रीय सणांच्या दिवशी सुखलांग रोलर स्केटिंग करणाऱ्या मुलांची तिरंगे झेंडे घेऊन मिरवणूक काढतो.

नागालॅण्डमधला रत्नागिरीत शिकलेला नायवांग कोन्याक बारावी करून नागालॅण्डला परतला. विज्ञान शाखेचा विद्याथ असूनही महाराष्ट्रात शिकल्यामुळे त्याचे हिंदी चांगले होते. त्याने काही काळ वर्धा येथील हिंदी राष्ट्रभाषा सभेच्या कोहिमा येथील शाखेत हिंदी शिक्षकांना हिंदी शिकवण्याचे काम केले. ‌‘कोविड‌’च्या काळात त्याने संघाच्या ‌‘जनजाती समिती‌’बरोबर काम करून छोट्या-छोट्या गावांत जाऊन घरोघर अन्नधान्याचे वाटप केले.

दारिलिन तांग महाराष्ट्रातून ‌‘एमकॉम‌’ करून परत गेली. दारिलिन तांगने मोखला येथील शाळेत विद्याभारतीच्या शाळेत मु‌‘याध्यापिकेचे काम केले. त्यानंतर ती ‌‘अखिल भारतीय विद्याथ परिषदे‌’ची पूर्णकालीन कार्यकत झाली. सध्या ती ‌‘अखिल भारतीय विद्याथ परिषदे‌’च्या राष्ट्रीय कार्यकारिणीची सदस्य आहे. हे काम करत असताना तिला ‌‘जी 20‌’साठी आलेल्या आंतरराष्ट्रीय सहभागींबरोबर जाण्याचे काम मिळाले. त्यानंतर असेच ती भारतातर्फे जपानला जाऊन आली.

दरिताने हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा केला. सध्या ती जगातील सर्वांत चांगल्या क‌‘जवर खूप मोठ्या पगारावर नोकरी करते. तिच्या पगारातून तिने तिच्या सर्व धाकट्या भावंडांचे शिक्षण केले व करीत आहे तसेच. तिच्या गावातील ‌‘सेंग खासी‌’ या संघटनेच्या शाळेतील एका शिक्षकाचा पगार दिला. तिचे उत्पन्न वाढल्यावर तिने तीच शाळा बांधून दिली. खेमेनलांग डखार मेघालयातील ‌‘पीएसआय‌’ परीक्षेमध्ये पहिला येऊन ‌‘पीएसआय‌’ झाला. दिमापुरचा अदीन झेलीयांग डेप्युटी कलेक्टर झाला. नांगबाचा नझारियस सुपेरिटेंडंट ऑफ पोलीस झाला. सध्या तर महाराष्ट्रातून शिकून ईशान्य भारतात गेलेले अनेक विद्याथ आहेत. त्यांच्यामध्ये शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनिअर, पोलीस, नर्सेस, सरकारी नोकरीत असलेले, स्वतःचा व्यवसाय करणारेही असं‌‘य आहेत. या प्रत्येकाची माहिती द्यायची ठरली, तर ती एकेक कथा होईल. हे सर्व आपल्या व्यवसायाबरोबर त्यांच्या समाजासाठी व संघ कामासाठी वेळ देतात व भरघोस काम करतात.

- पौर्णिमा राकेश मेहता