रंगकर्मी शिवदास घोडके स्मृतिजागर कार्यक्रम

01 Oct 2025 20:03:06

मुंबई : सांस्कृतिक कार्य विभाग, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित पु.ल. कट्टा या विशेष उपक्रमांतर्गत दिवंगत रंगकर्मी शिवदास घोडके यांच्या स्मृतिजागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता प्रभादेवीच्या रवींद्र नाट्यमंदिर इथल्या पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या मुख्य सभागृहात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सचे माजी विद्यार्थी, इप्टा, नाट्यशाळा, राष्ट्रीय नाट्य विद्यालय, युवक बिरादरी (भारत), प्रारंभ, सी.बी.डी बेलापूर, ऋतुरंग थिएटर, मुंबई व सर्व स्नेही तथा सहकारी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.


Powered By Sangraha 9.0