पंचपरिवर्तनात नागरी कर्तव्याचं स्थान

    01-Oct-2025
Total Views |

भारत माझा देश आहे... या शालेय प्रतिज्ञेतून आपण लहानपणीच कर्तव्यनिष्ठ नागरीकत्वाचे संस्कार आत्मसात केलेले आहेत. आजच्या वेगाने बदलणाऱ्या सामाजिक, राजकीय आणि तांत्रिक वास्तवात नागरिकांचे कर्तव्यपालन हा लोकशाहीच्या बळकटीकरणाचा मुख्य आधार आहे. पंचपरिवर्तनातील नागरी कर्तव्य ही संकल्पना केवळ कायद्याचे पालन करण्यापुरती मर्यादित नाही; तर ती एक जबाबदार, सजग आणि समरस समाज घडविण्याची संघटित प्रक्रिया आहे. या लेखात नागरी कर्तव्यांचे विविध पैलू तसेच नागरिकांनी अंगीकारावयाची सजगतेची भूमिका यांचा सविस्तर ऊहापोह करण्यात आला आहे.

भारत माझ देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे...” अशी प्रतिज्ञा आपण सगळ्यांनी शाळेत किमान दहा वर्षे नक्की म्हटली होती. याच प्रतिज्ञेत पंचपरिवर्तनाची सूत्रे सांगितली आहेत. परंपरांचा अभिमान, त्यांचे पालन करणे, पालक, गुरुजन यांचा आदर राखणे या गोष्टी तर आहेतच, पण “सगळ्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे. जय हिंद” यामध्ये तर पंचपरिवर्तनातील सगळ्यांत महत्त्वाचा भाग असलेल्या नागरी कर्तव्यांना अधोरेखित करण्यात आले आहे.

पंचपरिवर्तनातील नागरी कर्तव्यात सगळ्यांत महत्त्वाचा भाग आहे. तो म्हणजे देशाच्या घटनेने किंवा कायद्याने घालून दिलेल्या नियम, संकेत यांचे समाजामध्ये वावरताना पालन करणे. मग तो वाहतुकीचा विषय असो किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये याबद्दलचा. ही संकेतांची यादी खूप मोठी होऊ शकते. याची आणखी काही उदाहरणे पाहूया. कारण कोणताही विषय उदाहरणातून अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. सामान्यतः कायद्याचे पालन करणे सगळ्या नागरिकांसाठी अपेक्षित असलेली सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट. पण अनेकदा असं होताना दिसत नाही. लोक या ना त्या कारणाने विविध प्रकारच्या कायद्यांना बदल(बगल) देतात किंवा त्यातून अशी पळवाट काढतात. यामुळे अनेकदा कायदा थेट मोडला जात नाही, पण तो वाकवला किंवा अशा प्रकारे वळवला जातो की कायदा असून नसल्यासारखाच असतो. यामध्ये साधारणपणे वाहतुकीचे नियम पाळणे इथपासून ते निवडणुकीतल्या मतदानापर्यंत अनेक विषयांचा उल्लेख करता येईल. स्कूटर किंवा बाईकवरून तिघांनी प्रवास करणे, निवडणुकीत आमिषाला बळी पडणे किंवा मतदानाला न जाणे अशामुळे खरंतर आपणच दुसऱ्यांना बोलण्याचा अधिकार गमावतो. पण स्वतः न करणं आणि दुसऱ्याला उपदेश करणं, हा अनेकांचा स्वभाव झाल्याचं दिसतं. पण या आणि अशा विषयातील नियमांचं पालन केल्याने आपण एकप्रकारे लोकशाही बळकट करत असतो. तर नियमांचं पालन न केल्याने आपण आपल्याच लोकशाहीला मारक गोष्टी करत असतो, हे आपल्या लक्षातच येत नाही. ‌‘चलाता है‌’ ही वृत्ती जर आपला स्वभाव झाला, तर समाजासाठी तर आहेच पण आपल्या स्वतःसाठीसुद्धा घातकच आहे, हे आपल्या लक्षातच येत नाही. ‌‘चलाता है‌’ या वृत्तीने न्यायदान, पोलिसी कारवाई, डॉक्टरांचे उपचार झाले तर चालतील का, याचा प्रत्येकाने विचार केल्यास योग्य काय, हे दुसऱ्या कोणाला सांगण्याची गरजच नाही. या सगळ्यांत एक विचार असतो तो म्हणजे, नियमांचे पालन केले तर मला कोण बक्षीस देईल, माझे कोण कौतुक करेल; तर नियमांचे, कायद्याचे पालन करणे मुळातच अपेक्षित आहे. आपण नियमांचे, कायद्याचे पालन केले नाही,

तर मात्र आपण शिक्षेसाठी पात्र ठरू शकतो. यावेळी मात्र आपण ‌‘चलाता है‌’ या विचाराने त्याकडे पाहणार आहोत का? नक्कीच नाही ना? पण केवळ कायद्याचं आणि नियमांचं पालन म्हणजे सगळं नाही. संविधान आणि संविधानाने घालून दिलेल्या नियमांचं पालन हा एक छोटा भाग आहे. आपण अनेकदा नियम, कायदे आणि हक्क यांची चर्चा करतो. पण ही सगळी चर्चा करताना आपल्या कर्तव्याबद्दल बोलायचं सहजपणे विसरून जातो. खरंतर आपण जेवढे आपल्या हक्कांबद्दल आग्रही असतो ना, तेवढेच खरंतर त्याहीपेक्षा जास्त आपण आपल्या कर्तव्याबद्दल जागरूक असणं आवश्यक आहे. कारण दुसऱ्याला हक्क सांगताना आपल्या कर्तव्याच्या पालनाबद्दल आपण स्वतः किती काटेकोर आहोत, याबद्दलही आपण आग्रही असणं गरजेचं आहे. देशातल्या प्रत्येकाने कर्तव्याबद्दल जागरूक राहून वर्तन केले, तर हक्कांबद्दल आपोआप सगळेच सहज कृती करतील, याबद्दल माझ्या मनात शंका नाही.

या वैयक्तिक आणि सामाजिक कृतीच्या मागे नागरी शहाणपण किंवा सद्गुण अंगीकारण्यात धर्म हासुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे, असं मला ठामपणे वाटतं. कारण आपल्या देशात ‌‘आपण कायद्याचे पालन करा‌’ असा आग्रह धरतो. पण अनेक देशात धर्म सांगेल ती पूर्व दिशा, असं नागरिकांच्या मनावर ठसवले जाते आणि त्याचा परिणाम म्हणून विविध गुंतागुंतीच्या समस्या निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं. एक वेगळं उदाहरण द्यायचं तर सार्वजनिक ठिकाणी सिगारेट पिऊ नये, असा संकेत आहे. काही ठिकाणी तसा नियम असल्याचे ठळकपणे लिहिलेले असते. पण काही महाभाग, सिगारेट पिणे माझा अधिकार आहे, तुम्ही मला रोखू शकत नाही असं सांगतात किंवा रस्ता अडवून धर्माची कर्तव्ये पार पाडण्यासाठी आग्रह धरला जातो. अमानवी कृती सार्वजनिक ठिकाणी करण्याचा आग्रह धरला जातो. आमच्या धर्मात असंच आहे, असं सांगितलं जातं. पण समाजाला अपायकारक असलेल्या कृती म्हणजे अमानवी गोष्टी आहेत. अशा गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. यालाच जोडून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, गेल्या काही काळात धर्मनिरपेक्षता हा शब्द समाजात चर्चेचा झाला आहे. अनेकजण आपण फारच धर्मनिरपेक्ष असल्याचं मोठ्या कौतुकाने सांगत असतात. पण या मातीतील धर्माने सांगितलेल्या समाजहिताच्या अनेक गोष्टी अन्य धर्मांत शोधाव्या लागतात. उदा. पर्यावरणरक्षण, भूतदया, देव-देश-धर्मासाठी काम करणं, माणसातच देव शोधणं, स्त्रियांचा आदर-सन्मान, ‌‘अतिथी देवो भव‌’ अशा अनेक गोष्टी सांगता येतील. हिंदू धर्माइतका पर्यावरणस्नेही धर्म जगात कुठेही नाही, हे वास्तव आहे. पण काहींना आपला धर्म सोडून बाकी सगळं खोटं आहे, असंच लहानपणापासून शिकवलं जातं. समोरच्याचे विचार, धर्म, संस्कृतीचा आदर करण्याची पद्धत जगातल्या इतर धर्मांत नाही. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर, धर्मनिरपेक्षता हा भाग आपल्या देश, संस्कृतीचा भाग नाही. पण जर काही काळासाठी हा शब्द मानायचं ठरलं, तर सगळ्यांत जास्त धर्मनिरपेक्ष हिंदू धर्मच आहे, याबद्दल कोणाच्याही मनात शंका असायचं काहीच कारण नाही. पर्यावरण हा विषयसुद्धा नागरी कर्तव्यातील एका महत्त्वाच्या विषयाकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. तो म्हणजे पर्यावरण रक्षण. हा विषय तुम्ही शहरात राहात असाल किंवा गावात तुम्हाला सहजशक्य आहे. देशात हजारो वर्षांपूव असलेली झाडं, जंगलं हे काही माणसाने लावलेले नाही. पण उगवलेली झाडे अकारण तोडणं बंद केलं, तर आपण सहजपणे आपला परिसर हरित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो. ठाण्याच्या उपवन भागात लाखो झाडं आहेत.

या परिसरात रोज चालायला जाणाऱ्या काहीजणांनी ठरवलं की, इथल्या झाडांना आणि प्राण्यांना उन्हाळ्याच्या दिवसांत पाणी मिळत नाही; तर ते आपण ते देऊ. गेल्या आठ ते दहा वर्षांपासून आता चालायला जाणारे बहुतेकजण जाताना आपल्याबरोबर पाणी घेऊन जातात. प्राण्यांना पाणी पिण्यासाठी लोकसहभागातून व्यवस्था तयार करण्यात आली. झाडांना पाणी घालतात. यामुळे येऊर, उपवन परिसरातील हिरवाई टिकून आहे. असेच उपक्रम राज्यात अनेक ठिकाणी सुरू आहेत. किमान आपल्या सोसायटीमध्ये आपण सहज तीन-चार झाडं लावून त्याचं जतन, संवर्धन करू शकतो. तुमच्या माहितीत असे उपक्रम राबवले जात असतील, तर मला कळवा, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. सध्या समाजमाध्यम अर्थात सोशल मीडिया हाही मोठा विषय तयार झाला आहे. सोशल मीडियातील फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, युट्यूब ही आणि अशी अनेक माध्यमं सध्या लोकप्रिय आहेत. प्रत्येक प्रसारमाध्यमाची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. या सोशल मीडियाचे वापरकर्ते हजारो प्रकारचे विषय हाताळत असतात. त्यांचा प्रभावी वापर करून अनेकदा समाज आणि देशविघातक मुद्दे, विषय पसरवण्याचं काम केलं जातं. या सोशल मीडियाचा सकारात्मक उपयोग करणं गरजेचं आहे. पण गेल्या काही काळातला अनुभव असा आहे की, समाजविघातक वृत्तीचे लोक किंवा देशविरोधी कारवाया करणारे या सोशल मीडियाचा किंवा सोशल मीडियावरच्या प्रभावी लोकांचा (एन्फ्लुएन्सर) यांचा वापर करून देशविरोधी पसरवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. याचे सगळ्यांत मोठं उदाहरण ‌‘ऑपरेशन सिंदूर‌’च्या वेळी भारतातील काही एन्फ्लुएन्सरचा उपयोग करून देशाच्या सैन्यदल किंवा सरकारच्या विरोधात काही संदेश पोहोचवण्याचा, लोकांमध्ये संभ्रम

निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ज्यामध्ये पाकिस्तान काही प्रमाणात यशस्वी झालं. त्यामुळे पुढच्या काळात जबाबदार नागरिक म्हणून समाजात वावरताना आपण सोशल मीडियासारख्या आधुनिक रचनेतसुद्धा पारंगत नाही, तरी किमानपक्षी सजग असण्याची अत्यंत गरज आहे. आपल्या नागरी कर्तव्याचा तो एक अपरिहार्य भाग झाला आहे. हेदेखील आपण मान्य करायला हवं. ट्विटर किंवा फेसबुकवर चुकीची माहिती देणाऱ्या किंवा अतिरेकी, समाजविघातक विचार मांडणाऱ्या लोकांना अनेकदा उत्तर देणे टाळले जाते. पण सगळ्यांनीच जर असे उत्तर देणे टाळले, तर वाईट विचाराच्या लोकांचे फावते. त्यामुळे समाजातल्या सज्जनशक्तीने अशा सोशल मीडियावरच्या अपप्रचाराला उत्तर देणेसुद्धा आपल्या नागरी कर्तव्याचा भाग बनले आहे.

‌‘ऑरेशन सिंदूर‌’नंतर हे सिद्ध झालं आहे की देशासाठीचं युद्ध हे केवळ देशाच्या सीमेवर नाही, तर तुम्ही-आम्ही आपल्या घरी, गल्लीत, गावात, शहरात राहूनही लढू शकतो; त्याला मदत करू शकतो.

या नागरी कर्तव्यामध्ये पाच ‌‘ज‌’ महत्त्वाचे आहेत. जल, जंगल, जमीन, जानवर आणि जन या सगळ्यांबद्दल आपण खूप काम करू शकणार नाही. पण यापैकी एक विषय निवडून त्याबद्दल लोकांना बरोबर घेऊन नक्कीच काम करू शकतो. गेल्या काही वर्षांत काही आंदोलनांमध्ये सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करण्याचे प्रकार घडले. जे अतिशय दुर्दैवी होते. अशा सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानामुळे एक प्रकारे आपणच आपलं नुकसान करत असतो. पण हे आंदोलकांच्या लक्षातच येत नाही किंवा त्यांच्या अशा विघातक कृत्यांना आपण अजाणतेपणे बळी पडत आहोत, हे कळत नाही. सार्वजनिक मालमत्ता ही तुमची, माझी आपल्या सगळ्यांची मालमत्ता आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

सार्वजनिक स्वच्छता हा विषय काही फक्त स्वच्छता कर्मचाऱ्यांचा विषय नाही, तर तो सगळ्यांचा विषय आहे. पान खायला हरकत नाही, पण पान खाल्ल्यानंतर कुठेही थुंकणे, मात्र सार्वजनिक स्वच्छतेला मारक, रोगराई पसरण्यासाठी साहाय्य करणारे आहे. परदेशातील अनेक गोष्टींचे आपण तोंड भरून कौतुक करतो. पण आपल्या देशातील सार्वजनिक स्वच्छता, बंधुभाव, परस्पर सद्भावना, पर्यावरणरक्षण या सगळ्या विषयांमुळे जगातील अनेक देशही आपलं कौतुक करतील. फक्त त्यासाठी आपण छोट्या छोट्या गोष्टींचं भान राखण्याची गरज आहे. रोजच्या जीवनात आपण या गोष्टी सहज करू शकतो. त्याला वेगळा वेळ काढणं, वेगळे कष्ट करणं याची अजिबात गरज नसते.

महिलांबद्दल आदर हा मुद्दा आपल्या देशात हजारो शतकांपासून आहे. पण गेल्या काही दशकांत महिलांचा आदर करावा हेसुद्धा आपल्याला सांगण्याची, शिकवण्याची वेळ आली आहे. सहा ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना शिक्षण हा विषय आपल्याकडे मूलभूत अधिकारात धरला आहे. सरकारने तशी तरतूदही केली आहे. या सगळ्याबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शासकीय निर्णय, योजना व्यवस्था यातील सर्वसामान्य नागरिकांचा सक्रिय सहभाग. कोणत्याही देशातील नागरिक त्या देशातील सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या मागे ठामपणे उभे राहिले किंवा सरकारी योजनांच्या अंमलबजावणीत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला, तर ती योजना निश्चित यशस्वी होते. अशा योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे लोकांचाच फायदा होतो, हे समजून घेणं आवश्यक आहे.

हे सगळं वाचल्यावर तुम्हाला एक प्रश्न पडू शकतो. तो म्हणजे, हे सगळं मीच का करायचं? मला काय मिळणार? समोरचा करत नाही, तर मी काय करू? पण प्रत्येक नागरिक असाच विचार करायला लागला, तर कोणाला काहीच करता येत नाही. काहीच होणार नाही. आपल्याला हा देश, ही माती, इथलं पाणी, आपले शिक्षक, समाज बरंच काही देतो. कधीतरी आपण असाही विचार करायला हरकत नाही की, मी या सगळ्यांना काय देतो? मी समाज, गुरुजन, देश, माती, निसर्ग या सगळ्यांसाठी काय करतो? तर आपल्याला नागरी कर्तव्यामधील वर सांगितलेल्या सगळ्या गोष्टी का कराव्यात, याचं उत्तर आपोआप मिळेल. बरं, हा नागरी कर्तव्याचा विषय कोणा एकाचा, एकासाठी नाही, तर तो आपल्या सगळ्यांसाठी आहे.

खूप लहानपणी ऐकलेली एक गोष्ट सांगतो आणि थांबतो. एक शिकारी जंगलाच्या जवळ पक्षांना पकडण्यासाठी एक जाळं लावतो. तिथे मोठ्या प्रमाणात दाणे टाकतो. एक एक करत अनेक पक्षी तिथे दाणे खायला येतात आणि अडकून पडतात. शिकारी जवळच असतो. खूप पक्षी अडकलेले पाहून तो सुखावतो. दरम्यान, सगळे पक्षी मिळून आपापसांत ठरवतात की, आपण एकेकट्याने प्रयत्न करून सुटणार नाही, तर जास्त अडकून जाऊ. त्यापेक्षा सगळ्यांनी मिळून एकत्र प्रयत्न करूया. आणि तो शिकारी जवळ येताच सगळे पक्षी एकाचवेळी पंख पसरतात आणि आख्खं जाळं घेऊन आकाशात झेप घेतात. आणि शिकाऱ्याच्या हाती काहीच लागत नाही. पुढे बाकीच्या पक्ष्यांच्या मदतीने आपली सुटका करून घेतात. थोडक्यात काय, तर सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न केले. प्रत्येकाने आपापली भूमिका नीट पार पाडली, तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. सगळ्या जगाला प्रेम, शांती, कला, संस्कृती, योग, आयुर्वेद अशा अनेक गोष्टी देणाऱ्या आपल्या देशाला आणि पर्यायाने आपल्या सगळ्यांना यशस्वी, सुखी, समृद्ध आणि समाधानी व्हायचं असेल, तर पंचपरिवर्तनातील नागरी कर्तव्यांचे काटेकोर पालन हा सगळ्यांत महत्त्वाचा विषय आहे. 
सज्जनशक्तीने अशा सोशल मीडियावरच्या अपप्रचाराला उत्तर देणेसुद्धा आपल्या नागरी कर्तव्याचा भाग बनले आहे.

‌‘ऑरेशन सिंदूर‌’नंतर हे सिद्ध झालं आहे की देशासाठीचं युद्ध हे केवळ देशाच्या सीमेवर नाही, तर तुम्ही-आम्ही आपल्या घरी, गल्लीत, गावात, शहरात राहूनही लढू शकतो; त्याला मदत करू शकतो. या नागरी कर्तव्यामध्ये पाच ‌‘ज‌’ महत्त्वाचे आहेत. जल, जंगल, जमीन, जनावर आणि जन. या सगळ्यांबद्दल आपण खूप काम करू शकणार नाही. पण, यापैकी एक विषय निवडून त्याबद्दल लोकांना बरोबर घेऊन नक्कीच काम करू शकतो. गेल्या काही वर्षांत काही आंदोलनांमध्ये सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करण्याचे प्रकार घडले, जे अतिशय दुर्दैवी होते. अशा सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानामुळे एक प्रकारे आपणच आपलं नुकसान करत असतो. पण, हे आंदोलकांच्या लक्षातच येत नाही किंवा त्यांच्या अशा विघातक कृत्यांना आपण अजाणतेपणे बळी पडत आहोत, हे कळत नाही. सार्वजनिक मालमत्ता ही तुमची, माझी आपल्या सगळ्यांची मालमत्ता आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

सार्वजनिक स्वच्छता हा विषय काही फक्त स्वच्छता कर्मचाऱ्यांचा विषय नाही, तर तो सगळ्यांचा विषय आहे. पान खायला हरकत नाही, पण पान खाल्ल्यानंतर कुठेही थुंकणे, मात्र सार्वजनिक स्वच्छतेला मारक, रोगराई पसरण्यासाठी साहाय्य करणारे आहे. परदेशातील अनेक गोष्टींचे आपण तोंड भरून कौतुक करतो. पण, आपल्या देशातील सार्वजनिक स्वच्छता, बंधुभाव, परस्पर सद्भावना, पर्यावरणरक्षण या सगळ्या विषयांमुळे जगातील अनेक देशही आपलं कौतुक करतील. फक्त त्यासाठी आपण छोट्या छोट्या गोष्टींचं भान राखण्याची गरज आहे. रोजच्या जीवनात आपण या गोष्टी सहज करू शकतो. त्याला वेगळा वेळ काढणं, वेगळे कष्ट करणं याची अजिबात गरज नसते.

महिलांबद्दल आदर हा मुद्दा आपल्या देशात हजारो शतकांपासून आहे. पण गेल्या काही दशकांत महिलांचा आदर करावा हेसुद्धा आपल्याला सांगण्याची, शिकवण्याची वेळ आली आहे. सहा ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना शिक्षण हा विषय आपल्याकडे मूलभूत अधिकारात धरला आहे. सरकारने तशी तरतूदही केली आहे. या सगळ्याबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शासकीय निर्णय, योजना व्यवस्था यातील सर्वसामान्य नागरिकांचा सक्रिय सहभाग. कोणत्याही देशातील नागरिक त्या देशातील सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या मागे ठामपणे उभे राहिले किंवा सरकारी योजनांच्या अंमलबजावणीत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला, तर ती योजना निश्चित यशस्वी होते. अशा योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे लोकांचाच फायदा होतो, हे समजून घेणं आवश्यक आहे.

हे सगळं वाचल्यावर तुम्हाला एक प्रश्न पडू शकतो. तो म्हणजे, हे सगळं मीच का करायचं? मला काय मिळणार? समोरचा करत नाही, तर मी काय करू? पण प्रत्येक नागरिक असाच विचार करायला लागला, तर कोणाला काहीच करता येत नाही. काहीच होणार नाही. आपल्याला हा देश, ही माती, इथलं पाणी, आपले शिक्षक, समाज बरंच काही देतो. कधीतरी आपण असाही विचार करायला हरकत नाही की, मी या सगळ्यांना काय देतो? मी समाज, गुरुजन, देश, माती, निसर्ग या सगळ्यांसाठी काय करतो? तर आपल्याला नागरी कर्तव्यामधील वर सांगितलेल्या सगळ्या गोष्टी का कराव्यात, याचं उत्तर आपोआप मिळेल. बरं, हा नागरी कर्तव्याचा विषय कोणा एकाचा, एकासाठी नाही, तर तो आपल्या सगळ्यांसाठी आहे.

खूप लहानपणी ऐकलेली एक गोष्ट सांगतो आणि थांबतो. एक शिकारी जंगलाच्या जवळ पक्षांना पकडण्यासाठी एक जाळं लावतो. तिथे मोठ्या प्रमाणात दाणे टाकतो. एक एक करत अनेक पक्षी तिथे दाणे खायला येतात आणि अडकून पडतात. शिकारी जवळच असतो. खूप पक्षी अडकलेले पाहून तो सुखावतो. दरम्यान, सगळे पक्षी मिळून आपापसांत ठरवतात की, आपण एकेकट्याने प्रयत्न करून सुटणार नाही, तर जास्त अडकून जाऊ. त्यापेक्षा सगळ्यांनी मिळून एकत्र प्रयत्न करूया. आणि तो शिकारी जवळ येताच सगळे पक्षी एकाचवेळी पंख पसरतात आणि आख्खं जाळं घेऊन आकाशात झेप घेतात. आणि शिकाऱ्याच्या हाती काहीच लागत नाही. पुढे बाकीच्या पक्ष्यांच्या मदतीने आपली सुटका करून घेतात. थोडक्यात काय, तर सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न केले. प्रत्येकाने आपापली भूमिका नीट पार पाडली, तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. सगळ्या जगाला प्रेम, शांती, कला, संस्कृती, योग, आयुर्वेद अशा अनेक गोष्टी देणाऱ्या आपल्या देशाला आणि पर्यायाने आपल्या सगळ्यांना यशस्वी, सुखी, समृद्ध आणि समाधानी व्हायचं असेल, तर पंचपरिवर्तनातील नागरी कर्तव्यांचे काटेकोर पालन हा सगळ्यांत महत्त्वाचा विषय आहे.

- मिलिंद भागवत