केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! महागाई भत्त्यात ‘इतकी’ वाढ

    01-Oct-2025
Total Views |
Indian Currency
 
 
नवी दिल्ली (7th pay commission) : ४९ लाख १९ हजार केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. महागाई भत्त्यात एकूण तीन टक्क्यांनी वाढ होणार आहे. बुधवार, दि. १ ऑक्टोबर रोजी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत कर्मचारी आणि निवृत्तीवेतनात महागाई भत्ता ५५ टक्क्यांनी वाढवून ५८ टक्क्यांपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसहीत एकूण ६८.७२ लाख पेन्शनधारकांना याचा लाभ घेता येणार आहे. कॅबिनेट बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, “महागाई भत्ता (डीए), महागाई सहाय्यता (डीआर) या दोघांच्या वाढीमुळे केंद्र सरकारवर एकूण १० हजार ८३.९६ कोटींचा बोजा पडणार आहे. सातव्या वेतन आयोगातील तरतूदींनुसार ही वाढ करण्यात आली आहे. ज्यात महागाईनुसार, कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी तरतूद केली जाते.”