गांधीनगर : (Satrang 2025) ३८ वा पश्चिम विभागीय युथ फेस्टिव्हल "सतरंग २०२५" दिनांक ४ ते ८ जानेवारी २०२५ दरम्यान गणपत विद्यापीठ, मेहसाणा, गुजरात येथे संपन्न झाला. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा येथील ४४ विद्यापीठांनी सहभाग घेतला. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाने ४८ विद्यार्थ्यांचे व साथसंगती करणाऱ्या कलावंतांचे चमूह तयार केले, ज्यांनी संगीत, नृत्य, नाट्य, ललित कला आणि साहित्य अशा २८ स्पर्धांमध्ये भाग घेतला.
विद्यापीठाची कामगिरी:
१. भारतीय समूह गीत – प्रथम क्रमांक
२. लोकनृत्य – द्वितीय क्रमांक
३. रांगोळी – तृतीय क्रमांक
४. पाश्चात्य समूह गीत – चौथा क्रमांक
५. शास्त्रीय गायन (एकल) – पाचवा क्रमांक
६. पाश्चात्य गायन (एकल) – पाचवा क्रमांक
७. क्ले मॉडेलिंग – पाचवा क्रमांक
८. स्किट (नाट्य) – पाचवा क्रमांक
याशिवाय, विद्यापीठाच्या चमूने "डान्स इव्हेंट" गटामध्ये उपविजेतेपद पटकावले. या उल्लेखनीय यशाच्या जोरावर एनएनडीटी महिला विद्यापीठाची चमू फेब्रुवारी २०२५ मध्ये अमिटी विद्यापीठ, नोएडा, नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सव २०२५ साठी पात्र ठरली आहे. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या आदरणीय कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव यांनी चमुहचे अभिनंदन केले व राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या.