शार्क टँकचे सर्वात मोठे डील, तब्बल ५ कोटींचा व्यवहार!

शार्क पियुष बन्सलने मिळवला ५१ टक्के हिस्सा

    09-Jan-2025
Total Views |
 

piyush
 
 
 
मुंबई : अवघ्या देशाभरात अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या शार्क टँक या शोचे आतापर्यंतचे सर्वात मोठे डील साइन करण्यात आले आहे. या शोमधील शार्क पियुष बन्सल याने ही डील करत, नुई या आंतरराष्ट्रीय लाइफलस्टाइल ब्रँड मध्ये ५१ टक्क्यांचा हिस्सा मिळवला आहे. शार्क टँकच्या आतापर्यंत झालेल्या चार पर्वातील ही सर्वात मोठी डील आहे. भारतातील उदयोन्मुख स्टार्टअप्ससाठी हा शो एक प्रमुख आकर्षण ठरला आहे.
 
 
पियुष सुरी आणि निकीता पांडे यांनी स्थापन केलेला नुई हा ब्रँड लाइफस्टाइल क्षेत्रातील भारतातील एक प्रमुख ब्रँड आहे. आपल्या स्कॅन्डेव्हियन डेस्क सेट्स, डिझाइन्ससाठी हा ब्रँड प्रसिध्द आहे. नुई हा ब्रँड शार्क टँकमध्ये नेव्हर ऑड ऑर इव्हन ही संकल्पना घेऊन उतरला होता. यांच्या सादरीकरणामुळे शार्क पियुष बन्सल खूपच प्रभावित झाला आणि त्याने गुंतवणुकीत रस दाखवला. त्यानंतर झालेल्या डील नंतर पियुषने नुईमधील ५१ टक्के हिस्सा विकत घेतला.
 
 
या झालेल्या डीलबद्दल प्रतिक्रिया देताना पियुष सुरी याने सांगितले की " या झालेल्या डीलमुळे एका अविस्मरणीय प्रवासास सुरुवात झाली आहे. पियुष बन्सल यांचे मार्गदर्शन आम्हांला खूप फायदेशीर ठरणार आहे असा विश्वास आहे." शार्क टँक हा शो कायमच अशा नव्या स्टार्टअप्ससाठी खूपच फायदेशीर ठरला आहे. असेही मत त्याने नोंदवले.
 
 
भारत जगात स्टार्टअपची राजधानी म्हणून उदयाला येतो आहे. या अशा नवीन उद्योजकांना व्यासपीठ आणि गुंतवणुक संधी म्हणून शार्क टँक हा शो खूपच महत्वाचा ठरतो आहे. यातून उद्योजकांना आपल्या व्यवसाय वाढीसाठी फार मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत.