मुंबई : भारतीय शेअर बाजाराला लागलेले घसरणीचे ग्रहण संपण्याचे नाव घेत नाही. गुरुवारी ५२८ अंशांची घसरण होत ७७,६२० अंशांवर बाजार बंद झाला. निफ्टीमध्येही घसरणच होत १६२ अंशांनी खाली पडत, २३,५२६ अंशांवर बंद झाला. भारतातील प्रमुख आयटी तसेच पतपुरवठा कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण झाली. भारतासह आशियातील सर्वच प्रमुख बाजारपेठांना गुरुवारी घसरणीस सामोरे जावे लागले.
देशातील प्रमुख क्षेत्रांपैकी असलेल्या तेल व वायु क्षेत्रातील ओएनजीसी, याचबरोबर कोल इंडिया, बीपीसीएल, टाटा स्टील या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. याच बरोबर फायनान्स क्षेत्रातील प्रमुख कंपनी श्रीराम फायनान्स यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसली.
डॉलरच्या किंमतीत सातत्याने होत असलेली वाढ आणि त्याचबरोबर महागाई, चीनी अर्थव्यवस्थेचे दडपण यांमुळे भारतीय बाजारावर अनिष्ट परिणाम होत आहेत.