भारतीय करदात्यांना यंदाच्या अर्थसंकल्पात दिलासा मिळणार ?
यंदाच्या अर्थसंकल्पात नवीन सुधारणांच्या घोषणेची शक्यता
09-Jan-2025
Total Views |
नवी दिल्ली : यंदाचा अर्थसंकल्प हा मध्यमवर्गाला दिलासा देणारा ठरु शकतो. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी याबद्दलचे संकेत दिले आहेत. मध्यमवर्गाचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या प्राप्तिकर कायद्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे. यामुळे प्राप्तीकर भरण्यातल्या अडचणी दूर होऊन गेल्या काही वर्षातील गुंतवणुकदारांचे हजारो कोटींचे दावे निकाली निघण्याची शक्यता आहे.
प्राप्तीकर कायदा १९६१ मध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. यात आताच्या किचकट आकडेमोडीच्या ऐवजी नवीन सोप्या सुत्रांचा वापर करण्यात येणार आहे. आर्थिक वर्षाच्या व्याख्येत बदल केले जाणार आहेत. तक्त्यांद्वारे करविवरण, तसेच कर विवरण भरत असताना भराव्या लागणाऱ्या अर्जांची संख्या कमी करणे इ. सुधारणा करण्यात येणार आहेत.
अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी जुलै महिन्यात या प्राप्तीकर कायद्यात सुधारणांचे संकेत दिले होते. २०२३ या आर्थिक वर्षात करदाव्यांची रक्कम १०.५ ट्रिलीयन रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तरी या प्रस्तावित सुधारणांनी हे दावे निकाली निकाली निघण्याची शक्यता वाढली आहे.
संपूर्ण उद्योगक्षेत्रासह सर्वच थरांमधून करमुक्त उत्पन्न मर्यादेत वाढ करावी अशी मागणी केली जात आहे. यामुळे देशांतर्गत क्रयशक्ती वाढून मागणीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ५ लाख करण्याची मागणी केली जात आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात या गोष्टींचा समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.