भारत अणुऊर्जा निर्मितीत जगात सर्वात पुढे!

निर्मिती क्षमता दुपटीने वाढली

    09-Jan-2025
Total Views |
 
 
लह
 
 
 
नवी दिल्ली : भारताची अणुऊर्जा निर्मितीमध्ये जगापेक्षा दोन पावले पुढेच असल्याचे दिसून आले आहे. अमेरिकास्थित एका संस्थेने केलेल्या अभ्यासात ही माहिती पुढे आली आहे. फक्त २०२३ या वर्षात भारताची क्षमता ४.४ टक्क्यांनी वाढली जी जागतिक २.२ टक्के या वेगापेक्षा खुपच जास्त आहे. नुकताच भारतातील एनटीपीसी ( नॅशनल थर्मल पॉवर कॉरपोरेशन ) आणि अमेरिकास्थित सीसीटीई ( क्लीन कोअर थोरियम एनर्जी ) यांच्यात थोरियम पुरवठ्याबाबत करार संपन्न झाला.
 
 
भारत सरकारने २०३१-३२ पर्यंत आपल्या अणुऊर्जा निर्मिती क्षमतेत तिपटीने वाढ करुन सध्याच्या ८,१८० मेगावॅट क्षमतेपेक्षा २२,४८० मेगावॅट इतकी क्षमता गाठण्याचे ठरविले आहे. त्या दृष्टीने हा करार खुप महत्वाचा ठरणार आहे. यातून देशांतर्गत असलेल्या सर्वच अणुऊर्जा प्रकल्पांना इंधन पुरवठा सुनिश्चित होणार आहे.
 
 
भारतात अणुऊर्जेच्या वापराबद्दल आणि असलेले गैरसमज आता बऱ्यापैकी निवळत आले आहेत. येत्या काळात होणाऱ्या भारताच्या प्रगतीच्या दृष्टीने अणुऊर्जा हाच सर्वोत्तम पर्याय असू शकतो. असे मत भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी मांडले आहे.
 
 
येणाऱ्या काळात भारताची ऊर्जेची गरज मोठ्याप्रमाणावर वाढणार आहे. ही वाढती गरज भागवण्यासाठी अणुऊर्जा हा एक शाश्वत ऊर्जास्त्रोत असणार आहे. त्यामुळे भारत सरकारकडूनही अणुऊर्जा निर्मितीतील अडथळे दूर करुन या ऊर्जा निर्मितीला चालना द्यावी लागणार आहे.