लखनऊ : उत्तर प्रदेशातील संभलच्या चंदौसीमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत कारवाईचे आदेश देण्यात आले. या कारवाईअंतर्गत शहरातील मुन्सिफ रोडवर असलेल्या न्यायालयासमोर बळकावलेली व बांधलेली अवैध दुकांनावर पालिका प्रशासनाने बुलडोझर चढवत बांधकाम जमीनदोस्त केले.
नोव्हेंबर महिन्यापासून शहरामध्ये अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली होती. पालिका प्रमुख पालिकेच्या पथकासह मुन्सिफ रोडवर पोहोचले असता. तेथे उपजिल्हाधिकारी विनयकुमार मिश्रा यांनी बेकायदेशीरपणे बांधलेल्या दुकांनांटे सर्वेक्षण केले. त्यानंतर अवैध दुकांनांवर बुलडोझरच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली.
या कारवाईच्या माध्यमातून संभल पालिकेच्या पथकाने अतिक्रमणधारकांना सक्त ताकीद देण्यात आली की, त्यांनी ओळखल्या गेलेल्या ठिकाणचे अतिक्रमण काढण्यात आले असून त्याठिकाणी दंड आकारला जाईल. त्यामुळे आता संबंधित अवैध दुकानधारकांनी आपले दुकान अवैध जागेतून स्वत: काढले आहे.
तर दुसऱ्या बाजूला संभलच्या खग्गु सरायमध्ये असलेल्या कार्तिकिय मंदिरामागे असलेली घरे ही अवैध आहेत. या ठिकाणी गेल्यानंतर एसडीएमने घरमालकाला अतिक्रमण लवकर हटवण्याचा इशारा दिला. संबंधित वेळीतच जर अतिक्रमण हटवले नाहीतर काढले नाहीतर बुलडोझरसह कारवाई करण्यास सांगितली आहे. मंदिराच्या मागे असलेल्या परिक्रमा मार्ग असून त्यावर एका घराचे अवैधरित्या अतिक्रमण झाले असल्याचे सांगितले आहे.