दिल्लीत अरविंद केजरीवाल जिंकतील! पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

काँग्रेस आणि आप दिल्ली विधानसभा स्वतंत्र लढणार

    09-Jan-2025
Total Views |
 
Pruthviraj Chavan
 
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूकीत अरविंद केजरीवाल जिंकतील, असा दावा काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तसेच काँग्रेस आणि आम आदमी पक्ष दिल्ली विधानसभा स्वतंत्र लढवणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. 
 
एका वृत्तवाहिनीशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "दिल्ली विधानसभा निवडणूक ही खूप महत्त्वाची निवडणूक आहे. तिथे अरविंद केजरीवाल तिथे जिंकतील, असे मला वाटते. काँग्रेसही निवडणूकीच्या रिंगणात आहे. आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये युती झाली असती तर बरे झाले असते. पण तसे होताना दिसत नाही," असे ते म्हणाले.
 
 
 
पृथ्वीराज चव्हाण यांच्या या विधानामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत याबाबतचे स्पष्टीकरण दिले. दिल्ली विधानसभा निवडणूकीची तारीखा जाहीर झाली ५ फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर ८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. निवडणूकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १७ जानेवारी आहे.