देहरादून : उत्तराखंडमधील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर, हरिद्वारनजीक जमलापूर कलानमध्ये अवैधपणे एका मशिदीचे बांधकाम करण्यात आले होते. माध्यमाच्या वृत्तानुसार, जमलापूर कलानमधील सराय मार्गावर अधिकाऱ्यांकडून आवश्यक परवानगी न घेताच अवैध मशिदीचे बांधकाम करण्यात आले होते.
अहवालानुसार, मशिदीची इमारत ही अवैध जमीन घेतलेल्या ठिकाणी बांधण्यात आली आहे. जमिनीचे कागदपत्रे सादर करणे आवश्यक असल्याने त्या बांधकामाचे अवैधरीत्या इमारतीमध्ये रुपांतर करण्यात आले. त्यामुळे अधिकाऱ्यांकडून कोणत्याही कागदपत्रांची तपासणी झाली नव्हती. मात्र नंतर अवैधरीत्या घाईघाईने मशीद बांधण्यात आली.
हरिद्वार रुरकी विकास प्राधिकरणातील अवैध बांधकामाविरोधात स्थानिक हिंदू संघटनेच्या नेत्याने तक्रार दाखल केली. अवैध बांधकामाची माहिती अधिकाऱ्यांना मिळताच, हरिद्वार रुरकी विकास प्राधिकरणाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बेकायदेशीर बांधकाम बंद करत मशीद सील करण्यात आली. याप्रकरणी नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र त्या मशिदीच्या सदस्यांनी नोटीशीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. जर बांधकामाची क्रिया पुन्हा सुरू झाल्यास याप्रकरणात कारवाई केली जाईल.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, जिल्हा दंडाधिकारी किंवा संबंधित अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही धार्मिक स्थळाचे बांधकाम किंवा नूतनीकरण करता येत नाही असा आदेश दिला. महत्त्वाचे म्हणजे, अलीकडेच अधिकाऱ्यांनी मंगळौर विधानसभा पोटनिवडणुकीदरम्यान ज्वालापूरमधील एका मशिदीचे अवैध भव्य द्वार पाडण्यात आले होते.