हॉलिवूड आले धोक्यात, लॉस अँजेलिसमधील आगीच्या तांडवामुळे १००० इमारती जळून राख

    09-Jan-2025
Total Views |

los angeles 
 
 
हॉलिवूड चित्रपटसृष्टीतून अत्यंत दुर्दैवी गटना समोर आली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिसमध्ये भीषण आग लागली असून या आगीत जळून आत्तापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला असून १००० पेक्षा अधिक इमारतींची राख झाली आहे. लॉस एंजेलिसची ओळख हॉलिवूड कलाकारांचे घर अशी असून येथे लागलेल्या भयाण आगीमुळे हॉलिवूडकरांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या आपत्तीजन्य परिस्थितीमुळे कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन निवासम यांनी तेथे आणीबाणीची घोषणा केली आहे.
 
लॉस एंजेलिसमध्ये लागलेली ही आग ताशी ११२ किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अधिक पसरत जाऊन नियंत्रणाबाहेर गेली. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवणे प्रचंड कठीण झाले हवाई जहाजांनी आग विझवण्याचे काम सुरू असून त्यातून पाणी आणि अग्निशामक रसायने सोडली जात आहेत.
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार आगीमुळे ५२ ते ५७ अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. यापैकी बहुतांश नुकसान पॅसिफिक पॅलिसेड्समध्ये झाले असून लॉस एंजेलिसच्या इतिहासातील ही सर्वात मोठी आग आहे. यापुर्वी २००८ मध्ये स्लेमर येथे आग लागली होती तेव्हा तेथील ६०४ इमारती नष्ट झाल्या होत्या. या आगीची तीव्रता इतकी अधिक आहे की या आगीच्या विळख्यामुळे हॉलिवूडला मोठे नुकसान झाले असून ते अधिक वाढण्याची शक्यता आहे. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन निवासम यांनी दिलेल्या माहितीनुसार, १,४०० हून अधिक अग्निशमन दल त्याठिकाणी आग विझवण्याचे काम करत असून नुकसानग्रस्त भागात राहणाऱ्या लोकांसाठी मदत सुरु आहे.