बुलढाण्यात अचानक लोकांचे टक्कल का पडले? 'हे' कारण आले समोर!
09-Jan-2025
Total Views |
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील काही गावांमध्ये अचानक लोकांचे टक्कल पडायला सुरुवात झाल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यामागचे प्रमुख कारण आता पुढे आले आहे. इथल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात नायट्रेटसारखा अत्यंत विषारी घटक आढळून आला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून बुलढाण्यातील शेगावमधील पूर्णा नदीकाठच्या बोंडगाव, काठोरा, कालवड या गावांतील काही नागरिकांना अचानक केस गळतीच्या आजाराला तोंड द्यावे लागत आहे. नागरिकांना अचानक डोक्यात खाज येणे, केस गळणे आणि तीन दिवसांतंच टक्कल पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ५० हून अधिक नागरिकांना हा त्रास झाला आहे.
दरम्यान, या गावांमध्ये आरोग्य विभागाच्या वैदकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने सर्वेक्षण करून तिथले पाणी तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर इथल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात नायट्रेट सारखा विषारी घटक आढळून आला आहे. तसेच पाण्याची टीडीएस पातळीही भयंकर वाढल्याचे निदर्शनात आले आहे.