अवघ्या ३३वर्षी ८ हजार कोटींना कंपनी विकली, आता विचारतोय करायचं काय ? विनय हीरेमठ नक्की कोण आहे?

    08-Jan-2025
Total Views |
 
नगो
 
 
 
 
वॉशिंग्टन डीसी : आयुष्यात खुप मेहनत करायची खुप श्रीमंत व्हायचं असं प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं. यासाठी रात्रंदिवस मेहनत करणारे कितीतरी लोक आपल्याला आजूबाजूला दिसत असतात. ही श्रीमंती मिळवून काय करायचं याचे आराखडे देखील लोक बांधत असतात. पण अशी एखादी व्यक्ती आपल्या पाहण्यात आली आहे का ? की जी म्हणत आहे की आता इतका श्रीमंत झालोय की काय करायंच हेच कळत नाहीये, आणि त्या श्रीमंतीची भीती वाटायला लागली आहे? तर हे तंतोतंत खरं ठरलं आहे विनय हिरेमठ यांच्याबद्दल. वयाच्या अवघ्या ३३व्या वर्षी तब्बल ८ हजार कोटींचे ते मालक झाले आहेत.
 
 
 
 
 
 
भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक असलेल्या विनय हिरेमठ यांनी नुकतीच ते सहसंस्थापक असलेली लूम ही स्टार्टअप कंपनी ९७५ मिलीयन डॉलर्स म्हणजेच ८ हजार ३०० कोटींना विकली. अमेरिकेतील अॅटलाशियन या कंपनीशी हा करार नुकताच करण्यात आला. एवढ्या कमी वयात एवढे पैसे मिळाल्यावर त्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करत आता या श्रीमंतीची भीती वाटायला लागली आहे असे सांगितले आहे. ते त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात, " आता एवढे पैसे मिळाले आहेत की त्यांचं काय करायचं हे समजत नाहीये, आता पुन्हा पैसे कमवण्याची इच्छाच मिळाली आहे. माझ्या पुढच्या आयुष्याबद्दल मी फार आशावादी नाहीये".
 
 
पुढच्या आयुष्याबद्दल निराश असणारे विनय हिरेमठ हे आता फिजिक्स या विषयात पुढील कार्य करू इच्छितात. त्याआधी त्यांनी रोबोटिक्स या विषयात प्राविण्य मिळवण्यासाठीसुध्दा प्रयत्न केले पण त्यात त्यांना यश आले नाही.