HMPV व्हायरस पसरतो कसा? बालके आणि लहान मुलांमधील लक्षणं नेमकी कोणती आहेत? जाणून घ्या...
08-Jan-2025
Total Views |
मुंबई : (HMPV) महाराष्ट्रासह देशभरात एचएमपीव्ही व्हायरसचे रुग्ण आढळून येत आहेत. पण हा व्हायरस पसरतो कसा? तर जेव्हा एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या खोकणे, शिंकणे, बोलणे इत्यादी क्रियेतून श्वसनाच्या थेंबाद्वारे एचएमपीव्ही व्हायरसचा प्रसार होतो.या व्हायरसपासून संक्रमित होण्याचा कालावधी ३ ते ५ दिवसांच्या दरम्यान असतो. यामध्ये बदलही होऊ शकतात.
एचएमपीव्ही (HMPV) व्हायरसची तीव्रता ही कोरोनापेक्षा कमी असल्याने या व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूचा दरही कमी आहे. एचएमपीव्ही व्हायरस हा न्यूमोव्हिरीडी गटातला आहे. व्हायरसची तीव्रता वाढल्यास न्यूमोनिया होण्याचीही लक्षणं दिसून येतात. ऑक्सिजनची पातळी कमी होऊ शकते. या व्हायरसपासून जास्त धोका नसल्याचे म्हटले जात आहे.
एचएमपीव्ही बालके आणि लहान मुलांमधील लक्षणे
भारतासह मुंबईमध्ये एचएमपीव्ही व्हायरसचा संसर्ग झालेले दोन्ही रुग्ण ही लहान बालके आहेत. तसेच आतापर्यतच्या माहितीनुसार, एचएमपीव्ही व्हायरसची लागण हा सहसा अगदी कमी किंवा खूप जास्त वय असलेल्या व्यक्तींना होतो. विशेषतः लहान बालकांना एचएमपीव्ही व्हायरसची लागण होण्याचा धोका अधिक असतो.