इस्त्रोच्या नव्या अध्यक्षांची घोषणा, १४ जानेवारी रोजी कार्यभार स्वीकारणार

08 Jan 2025 13:19:28
 
isro
  
नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या नव्या अध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. १४ जानेवारी रोजी डॉ. व्ही. नारायणन (Dr. V. Narayanan) इस्रोच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारतील. मंगळवार, दि. ७ जानेवारी रोजी यासंदर्भातील अधिसूचना जारी करत माहिती देण्यात आली आहे. डॉ. व्ही. नारायणन यांनी चार दशकांच्या कारकिर्दीत इस्रोमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. डॉ. नारायणन यांचे वैशिष्ट्य रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट प्रोपल्शनमध्ये आहे.
 
अनेक मिशनमध्ये महत्त्वाचे योगदान
 
डॉ. नारायणन यांच्या मार्गदर्शनात LPSC ने इस्त्रोच्या विविध मिशनसाठी १८३ लिक्विड प्रोपल्शन सिस्टम आणि कंट्रोल पॉवर प्लांट डिलीव्हर केले. त्यांनी पीएसएलव्हीच्या दुसऱ्या आणि चौथ्या टप्प्याच्या निर्मितीची देखरेख आणि PSLV C57साठी कंट्रोल पावर प्लांटही तयार केले. त्यांनी आदित्य स्पेसक्राफ्ट, GSLV Mk-III मिशन, चांद्रयान २ आणि चांद्रयान ३ साठी प्रोपल्शन सिस्टीममध्येही योगदान दिले.
 
विविध पुरस्कारांनी सन्मानित
 
इस्त्रोचे शास्त्रज्ञ डॉ. नारायणन यांना अनेक पुरस्कार आणि सन्मानांनी सन्मानित करण्यात आले आहे. यात आयआयटी खडकपूर येथून रौप्य पदक, अॅस्ट्रोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाचे सुवर्णपदक आणि एनडीआरएफ येथून राष्ट्रीय डिझाईन पुरस्कारांचा समावेश आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0