भारतातील हिरे व्यापार सक्षमीकरणासाठी जीजेईपीसी आणि डी बीअर्स ग्रुप यांच्यात करार संपन्न.

भारतात नवीन गुंतवणूक संधी निर्माण करण्यावर देणार भर

    08-Jan-2025
Total Views |
 
gjepc
 
 
 
 
 
मुंबई : भारतीय हिरे व्यापारी आणि ग्राहक यांच्या सक्षमीकरणासाठी जीजेईपीसी आणि जगातील आघाडीची हिरे व्यापार कंपनी डी बीअर्स यांच्यात मंगळवारी करार संपन्न झाला. मुंबई येथील जीओ कन्व्हेंशन सेंटर येथे सुरू असलेल्या इंडीयन इंटरनॅशनल डी बीअर्स कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ज्वेलरी शो आयआयजेएस मध्ये हा करार संपन्न झाला. जीजेईपीएसचे अध्यक्ष विपुल शाह आणि डी बीअर्स कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सॅंड्रिन काँन्सिलर यांनी या करारावर स्वाक्षरी केली. भारतातील रिटेल हिरे व्यापाऱ्यांना सक्षमीकरणासाठी आखण्यात आलेल्या या प्रकल्पाचे नाव इंद्रा ( इंडीयन नॅचरल डायमंड रिटेल अलायन्स ) असे नाव देण्यात आले आहे. या कराराने येत्या काही वर्षात भारतातील
 
भारतात सध्या एकूण दागिने बाजारपेठेतील फक्त १० टक्के हिस्सा हिरे व्यापाराचा आहे. त्यामुळे भारतात हिरे व्यापाऱ्याच्या विस्तारास मोठा वाव आहे. या व्यापारवाढीसाठीच भारतातील सर्व छोट्या - मोठ्या रिटेलर्सना प्रशिक्षण, अनुभव, आर्थिक सहाय्य देण्याचे या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यातून भविष्यात हिरे व्यापाराचा देशातील दागिने व्यापारातील वाटा हा १५ टक्क्यांवर जाणे अपेक्षित आहे. कराराच्या माध्यमातून भारतातील हिरे व्यापार क्षेत्रात निर्माण होणाऱ्या नव्या संधींना गवसणी घालण्याचे काम होणार आहे, असे मत जीजेईपीएसचे अध्यक्ष विपुल शाह यांनी मांडले.
 
भारताचे आणि हिरे व्यापाराचे नाते खूप जुने आहे. भारतीय कायमच हिरे वापरण्यात आघाडीवर राहिले आहेत. त्यामुळे या व्यापाराच्या विस्तारासाठी खूप मोठा वाव आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही सर्व छोट्या - मोठ्या रिटेल हिरे व्यापाऱ्यांना सक्षम करण्याचे ध्येय ठेवणार आहोत. या व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांना कायमच हिरे व्यापारात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. गुणवत्ता, खरेपणा या सर्वच पातळ्यांवर चाचणी करावी लागते. जे छोट्या व्यापाऱ्यांना शक्य नसते. जे या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही शक्य करून देणार आहोत. ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना परवडेल अशा किंमतीत हे हिरे उपलब्ध केले जातील. त्यामुळे लवकरच या प्रकल्पाच्या माध्यमातून या क्षेत्रात मोठा बदल घडवला जाणार आहे. असे मत सॅंड्रिन काॅॅंन्सेलर यांनी नोंदवले.
 
भारतातील हिरे आणि दागिने निर्मिती व्यापारात हा करार मोठा मैलाचा दगड ठरणार आहे आणि यातून भविष्यात भारतीय हिरे व्यापार हा भारताची ओळख बनेल असे जीजेईपीएस कडून सांगण्यात आले आहे.