विक्रांत मेस्सीचा 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपट ओटीटीवर पाहता येणार, तारीख जाणून घ्या...

    08-Jan-2025
Total Views |
 
sabarmati report
 
 
मुंबई : अभिनेता विक्रात मेस्सी याची प्रमुख भूमिका असणारा ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट १५ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला होता. शोभा कपूर, एकता आर. कपूर, अमूल व्ही. मोहन आणि अंशुल मोहा यांची निर्मिती असलेला हा चित्रपट आता ओटीटी प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून ZEE5ने 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटाच्या वर्ल्ड प्रीमियरची घोषणा केली आहे.
 
धीरज सरना दिग्दर्शित या चित्रपटात २००२ मधील गोध्रा रेल्वे जळीत प्रकरणावर निर्भीडपणे प्रकाश टाकण्यात आला आहे. या घटनेत साबरमती एक्सप्रेसमधील भीषण हिंसाचारात निरपराध प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्याची गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
 
विक्रांत मेस्से, राशी खन्ना आणि ऋद्धी डोगरा यांनी या दमदार चित्रपटात अभिनय केला आहे. १० जानेवारी २०२५ रोजी ZEE5 वर 'साबरमती रिपोर्ट' या चित्रपटाचा प्रीमियर होणार आहे.