सेवा भारती कोकण प्रांत ट्रस्ट आयोजित 'स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार २०२५'

    08-Jan-2025
Total Views |

Seva Bharati Kokan Prant Trust

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Swami Vivekanand Yuva Puraskar) 
स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त सेवा भारती कोकण प्रांत ट्रस्टच्या वतीने स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावर्षी आरोग्य क्षेत्रामधील विशेष कार्यासाठी उलवे, नवी मुंबई येथील डॉ. दीपाली बापूराव गोडघाटे यांना 'स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार' प्रदान करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम रविवार, दि. १२ जानेवारी रोजी सकाळी ठीक १० वाजता श्री. जोमा नारायण घरत समाज मंदिर, रामशेठ ठाकूर क्रीडा संकुलासमोर, शेलघर, सेक्टर १६, उलवे, (नवी मुंबई) येथे संपन्न होईल.

हे वाचलंत का? : दिव्यांगांसाठी समर्पित एक कुटुंब : अतुल्य इनक्लुसिव्ह सेल

डॉ. दीपाली बापूराव गोडघाटे या कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर मात करण्यासाठी अथकपणे व निरलसपणे कार्य करणाऱ्या दीपिशा कॅन्सर सेंटर आणि रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संचालिका आहेत. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य विवेक दिगंबर भागवत उपस्थित असतील. समारंभाचे अध्यक्ष म्हणून टाटा मेमोरिअल सेंटरचे मानद कर्करोग तज्ज्ञ डॉ. अमर देवदत्त देशपांडे यांची उपस्थिती असेल.