'एक देश एक निवडणूकीला' आमचा विरोध; संजय राऊतांचे विधान
संयुक्त संसदीय समितीची आज पहिली बैठक
08-Jan-2025
Total Views |
मुंबई : एक देश एक निवडणूकीला आमचा विरोध आहे, असे वक्तव्य उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केले आहे. बुधवार, ८ जानेवारी रोजी एक देश एक निवडणूक याबाबत संयुक्त संसदीय समितीची (जेपीसी) पहिली बैठक होणार आहे. त्याआधी संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत म्हणाले की, "एक देश एक निवडणूक हे विधेयक लोकसभेत आणले. त्यानंतर ते लोकसभेत येऊ शकले नाही आणि संयुक्त संसदीय समितीकडे ते गेले आहे. संयुक्त संसदीय समितीत सर्व पक्षांचे लोक असतात. आज संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक असून इंडिया आघाडीचे सर्व सदस्य त्यात हजर राहतील. आमच्या पक्षाचे सदस्य अनिल देसाई हेसुद्धा त्या समितीत असून ते आपली भूमिका मांडतील. वन नेशन वन इलेक्शनला आमचा विरोध आहे. हे लोकशाहीविरोधी, घटनाविरोधी आणि संविधानविरोधी आहे. भविष्यात एक पक्ष एक निवडणूक आणि एक नेता एक निवडणूक अशा प्रकारच्या हुकुमशाहीकडे नेणारे हे विधेयक आहे," असे ते म्हणाले.
देशातील निवडणुक प्रक्रियेला गती मिळावी यासाठी लोकसभेत एक देश एक निवडणूक विधेयक सादर करण्यात आले होते. पण इंडी आघाडीच्या घटक पक्षांनी या विधेयकास तीव्र विरोध दर्शवला होता. त्यानंतर हे विधेयक संयुक्त संसदीय समिती अर्थात जेपीसीकडे रवाना करण्यात होते. त्यानंतर आता या समितीची पहिली बैठक आयोजित करण्यात आली आहे.