दीपिका पादुकोण-रणवीर सिंग होणार शाहरूख खानचे शेजारी!

    08-Jan-2025
Total Views |
 
deepika padukone
 
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कपम रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांना काही महिन्यांपूर्वी कन्यारत्न प्राप्त झाले. रणवीर-दीपिकाने त्यांच्या मुलीचं नाव दुआ असे ठेवले असून लवकरच सिंग-पादुकोण कुटुंब शाहरुख खानचे शेजारी होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मन्नत शेजारी नव्या घरात दीपिका-रणवीर शिफ्ट होणार आहेत. तसेच, दुसरीकडे राहासाठी देखील आलिया आणि रणबीरने नवं घर बांधलं असून ते देखील नव्या घरात लवकर जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
 
बॉलिवूड लाईफने दिलेल्या रिपोर्टनुसार, दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग त्यांच्या नवीन घरात शिफ्ट होणार असून हे नवीन घर शाहरुख खानच्या मन्नतजवळ आहे. दीपिका-रणवीरच्या या सी फेसिंग बंगल्याची किंमत अंदाजे १०० कोटी रुपये असून ११, २६६ स्क्वेअर फूटमध्ये बांधण्यात आले आहे. तर, मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार रणवीर आणि दीपिकाची टेरेस १,३३० स्क्वेअर फूट आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांच्या घराचे बांधकाम जवळपास पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले आहे.
 
दीपिका आणि रणवीरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास सध्या दीपिकाने कामातून ब्रेक घेतला असून ती पुर्ण वेळ दुआ सोबत घालवत आहे. कल्की २८९८ एडी, सिंघम अगेन या दोन चित्रपटात नुकतीच दीपिका झळकली होती. तर, रणवीर सिंघम अगेन चित्रपटात दिसला होता. सध्या, रणवीर ‘धुरंधर’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.