AI ची किमया न्यारी! १९ वर्षांपूर्वी केलेल्या खूनाचा अखेर पर्दाफाश

    08-Jan-2025
Total Views |
 
AI technology
 
तिरुवनन्तपुरम : केरळ पोलिसांनी एआय या तंत्रज्ञानाचा (AI technology) वापर करत एका महिलेच्या आणि तान्ह्या बाळाची हत्या करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. महिला ही केवळ १९ वर्षांची असून लहान बाळ हे १७ दिवसांचे होते. मिळालेल्या अहवालानुसार, २००६ मध्ये एक महिला आणि तिची १७ दिवसांचे दोन जुळी नवजात अर्भक मारली गेल्याची काळीज हेलावून टाकणारी घटना घडली.
 
याप्रकरणात एआयच्या माध्यमातून दोन मुख्य संशयितांची ओळख पटवण्यास मदत झाली आहे. संशयित फरार झाले असून त्यांना शोधण्यास सर्व अयशस्वी ठरले. गुन्हा घडला त्यावेळी माजी लष्करी जवान पठाणकोटमध्ये तैनात होते.
 
याप्रकरणात १९ वर्षानंतरच्या सीबीआयने अखेर २ संशयितांना पद्दुपेरीत अटक करण्यात आली आहे. या आरोपींनी आपले मूळ नाव लपवत विष्णू आणि प्रवीण कुमार अशी नावे बदलली. तसेच ते स्वत: इंटेरियर जिझायनरचा व्यवसाय करत होते. त्या दोघांचा विवाह पद्दुचेरी येथील शाळेतील शिक्षकांसोबत झाला होता.
 
केरळचे एडीजीपी मनोज अब्राहम यांनी प्रसारमाध्यांना माहिती दिली की, तपास यंत्रणा पथकाने दिलीप कुमार आणि राजेश यांचे जुने फोटो स्कॅन करत त्यांच्या फोटोची योग्य ती माहिती मिळवली. आरोपींचे स्पष्टपणे चेहरे दिसावे यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला. त्यांनी हे दोन पुरुष १९ वर्षानंतर कसे दिसतील याचे फोटो तयार करण्यात आले.
 
दरम्यान, आता सोशल मीडियाच्या प्रोफाईल्सवर असणाऱ्या फोटो आणि हा त्यांच्या जुन्या फोटोशी ९० टक्के जुळाल्याचा आढळून आला आहे. त्यावेळी त्याची शोधमोहिम करण्यात आली. त्यानंतर पुन्हा आरोपीची १९ वर्षानंतर शारीरिक तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी शारीरिक तपासणी केलेले तपशील सीबीआयकडे सोपवण्यात आले आहेत. यानंतर याप्रकरणाचा खुलासा समोर आला आहे.