आमदार पराग शाह यांचे आदेश : विभागनिहाय अधिकाऱ्यांची बोलावली बैठक
08-Jan-2025
Total Views |
मुंबई : घाटकोपरमधील समस्या तात्काळ मार्गी लावा, असे आदेश घाटकोपर पूर्व विधानसभेचे आमदार पराग शाह यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. बुधवार, ८ जानेवारी रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका एन विभाग येथे घाटकोपरमधील विविध समस्यांबाबत त्यांनी प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.
यावेळी रवी पुज, विकास कामत, भालचंद शिरसाट, बिंदुबेन त्रिवेदी, सर्व वॉर्ड अध्यक्ष, महानगरपालिका एन विभागाचे सर्व अधिकारी, एमएमआरडीए मेट्रो विभागाचे अधिकारी, चेंबूर आणि विक्रोळी विभागाचे ट्राफिक पोलीस अधिकारी यांच्यासह घाटकोपरमधील विविध विकासक उपस्थित होते.
या बैठकीत मेट्रोचे थांबलेले काम, अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत पार्किंग, अनधिकृत रिक्षावाले, घाटकोपर मधले ट्राफिक, विकासकामार्फत गिळंकृत केलेला फूटपाथ, रस्त्यावर अनधिकृत पणे उभ्या असलेल्या गाड्या, मेट्रोच्या कामामुळे बाधित होणारे रस्ते, गिगा वाडी येथील जीर्ण झालेली नाल्याची भिंत आणि तेथील रहिवाशांना कमी दाबाने येणारे पाणी, AGLR चे संथगतीने सुरू असलेले काम, अनधिकृतपणे उभ्या केलेल्या गाई, गौरीशंकर वाडी येथील नाट्यगृह, असे अनेक विषय मांडण्यात आले. या विषयांशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना आमदार पराग शाह यांनी जाब विचारला. तसेच संबंधित विषय तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश दिलेत.