मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Mahakumbh official Website News) प्रयागराज येथे महाकुंभाला सुरुवात होत असून उत्तर प्रदेश सरकारकडून यंदा आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक वापर होत असल्याचे दिसते आहे. महाकुंभाबाबत अधिक माहितीसाठी kumbh.gov.in ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे १८३ देशांतील ३३ लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी महाकुंभच्या या अधिकृत वेबसाइटला भेट दिली आहे.
हे वाचलंत का? : यंदाचा महाकुंभ विश्वस्तरावर गाजणार; ८२ देशांतील प्रसारमाध्यमे घेणार दखल
वेबसाइटच्या डेटानुसार, दि. ४ जानेवारीपर्यंत ३३ लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी या अधिकृत महाकुंभ पोर्टलला भेट दिली असून जगभरातील तब्बल ६२०६ शहरांमधून भेटी नोंदवल्या गेल्या. आलेल्या अभ्यागतांनी केवळ वेबसाइटवर प्रवेश नाही केला तर तिची सामग्री एक्सप्लोर करण्यात बराच वेळ घालवल्याचेही कळत आहे. उत्तर प्रदेश सरकारे महाकुंभला डिजिटल स्वरूप आणले असून भाविकांच्या सोयीसाठी अनेक डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आले आहेत. वेबसाइट भेटींमध्ये भारत आघाडीवर आहे, त्यानंतर युनायटेड स्टेट्स, ब्रिटन, कॅनडा आणि जर्मनीमधून भरीव वेब ट्रॅफिक आहे. दि. ६ ऑक्टोबर २०२४ रोजी वेबसाइट लाँच झाल्यापासून तांत्रिक टीमने ट्रॅफिकमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली आहे,