मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Mahakumbh International coverage) प्रयागराज येथे होणारा महाकुंभ हा अध्यात्म आणि नवनिर्मितीचा अनोखा संगम असणार आहे. कारण सनातन धर्माच्या पवित्र परंपरांसह अत्याधुनिक डिजिटल प्रगती महाकुंभात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे देश-विदेशातील प्रसारमाध्यमेही महाकुंभाच्या कव्हरेजसाठी उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. महाकुंभाच्या कव्हरेजसाठी आतापर्यंत ८२ देशांतील माध्यमांनी अर्ज केले आहेत.
हे वाचलंत का? : महाकुंभात पहिल्यांदाच 'फ्लोटिंग हाऊस'ची सुविधा
महाकुंभाचे कव्हरेज करण्यासाठी युरोपीय देशांमधून जास्तीत जास्त मीडिया ग्रुप येत आहेत. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातूनही मोठ्या प्रमाणात न्यूज चॅनल येत आहेत. आखाती देशांबरोबरच आफ्रिकन राष्ट्रांतील मीडियाही याठिकाणी पोहोचणार असल्याची माहिती अपर जिलाधिकारी (एडीएम) कुंभमेळा विवेक कुमार चतुर्वेदी यांनी दिली. त्यांच्या मुक्कामासाठी इंटरनॅशनल मीडिया हाऊस कॅम्प जवळजवळ तयार आहेत. याशिवाय मीडिया सेंटरही बांधण्यात येत आहे. ज्याचे उद्घाटन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या पुढील भेटीदरम्यान होण्याची शक्यता आहे.