बांगलादेशी हिंदू युवकाचा गळा आवळत केली हत्या, रक्ताच्या थारोळ्यात असलेला मृतदेह पोलिसांनी घेतला ताब्यात
08-Jan-2025
Total Views |
ढाका :बांगलादेशात एका हिंदू (Bangladeshi Hindu) युवकाची गळा आवळत हत्या करण्यात आली आहे. सुदेव हलदर असे युवकाचे नाव असून मंगळवारी पोलिसांनी उपजिल्हा नमग्राम युनियनच्या रामपूर जोरा पोल परिसरातून त्याचा रक्तबंबाळ मृतदेह ताब्यात घेतला होता. ही घटना ६ जानेवारी २०२५ रोजी घडली आहे. यामुळे बांगलादेशातील हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे याहून कोणतेही उत्तम उदाहरण नाही.
सुदेव हा सदर उपजिल्ह्यातील बेत्रा गावातील सुबोध हलदर यांचा मुलगा आहे. स्थानिक बाकाठी बाजारपेठेमध्ये त्यांचे मोबाईल फोन दुरूस्तीचे दुकान आहे.
याप्रकरणात पोलीस प्रशासनाने आणि स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दुकान बंद करून घरी जात असताना हल्लेखोरांनी सुदेवची हत्या केली. सकाळी स्थानिकांनी मृतदेह पाहिला असून त्याची माहिती स्थानिकांनी दिली. याप्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
सुदेवचे वडील सुबोध हलदर म्हणाले की, माझ्या मुलाला कोणाताही एक शत्रू नव्हता, माझ्या मुलाला कोणी आणि का मारले हे मला ठाऊक नाही. पोलिसांनी याप्रकरणातील सत्य उघड केले, असे ते म्हणाले.
याप्रकरणात झलकाठी सदर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी मोनीरुझमान यांनी सांगितले की, सुदेवच्या डोक्याला आणि मानेवर अनेक वार करण्यात आले आहेत. ही एक हत्या असल्याचे सांगण्यात आले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी बांगलादेशातील ढालकाठी येथे नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आला. यानंतर आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून कायदेशीर कारवाई करत आहेत.