बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना

सलग सात महिने बापानेच केला पोटच्या लेकीवर बलात्कार

    08-Jan-2025
Total Views |

Father-daughter Relation
 
तिरुवनंतपुरम : केरळमधील कन्नूरमध्ये एका पुरुषाने आपल्या लेकीवर ७ महिने बलात्कार केल्याने बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. याप्रकरणी आता न्यायालयाने आरोपीला जन्मठेप आणि १५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरोपीचे कतारमध्ये रेस्टॉरंट असून हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याला भारतात बोलावून अटक केली आहे. न्यायालयाने याप्रकरणी आपला निकाल दिला आहे. दरम्यान, जामीन मिळाल्यानंतर बलात्कारी पिता हा फरार झाला.
 
याप्रकरणाच्या अहवालामध्ये म्ह़टले आहे की, २०२० मध्ये एका एनआरआय कुटुंब हे कन्नूर, केरळमध्ये आले. कोविड प्रतिबंधांमुळे, त्या व्यक्ती एका वेगळ्या खोलीमध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी अन्न पाण्याच्या सोयीसाठी पित्याजवळ पीडितेला ठेवण्यात आले होते. त्यावेळी अल्पवयीन मुलगी ही आपल्या पित्याला जेवण देण्यासाठी गेली असता, पित्याने आपल्या कोवळ्या जीवावर बलात्कार केला. त्यानंतर तो तिथून कतारला निघून गेला.
 
कालांतराने मुलगी ही गरोदर राहिली असून तिला अजारपण आले. तिला अशक्तपणा येऊ लागला होता. त्यावेळी तिला डॉक्टरकडे दाखल करण्यात आले. पीडित युवती ही गर्भवती असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. याप्रकरणी आता पोलिसांनी तिची चौकशी केली असता, पीडितेने वडिलांचे नाव न घेता चुलत बहिणीवर बलात्काराचा आरोप केला. पीडितेने सांगितले की, तिचा भाऊ तिला अश्लिल काहीबाही दाखवत तिच्यावर बलात्कार करायचा. मात्र नंतर तिने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला, त्याआधारे पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली.
 
या घडलेल्या घटनेनंतर आरोपी हा भारतातून फरार झाला. त्यानंतर तो काही कालावधीनंतर तो भारतात आला होता. त्यावेळी त्याला पोलिसांनी पकडले. या तपासादरम्यान पोलिसांनी तिच्या रक्ताची चाचणी केली होती. तसेच गर्भधारणेची तपासणी केली असता त्यात तिच्या वडिलांकडून गर्भधार झाले असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या एकूण खटल्यानंतर आरोपीला जामीन मिळाला आणि तो घटनास्थळावरून फरार झाला. त्यानंतर आईने आपल्या मुलीचा साथ सोडली आणि ती पतीला साथ देऊ लागली.
 
दरम्यान, ५ जानेवारी २०२५ रोजी पोलिसांना याप्रकरणाची माहिती मिळाली, आरोपी त्याच्या घरी आला असता तो तिच्याच घरी वास्तव्य करत होता. यानंतर पोलिसांनी आरोपीला आपल्या ताब्यात घेतले आणि दोन दिवसांत न्यायालयाने हा निकाल जाहीर केला. न्यायालयाने आरोपी वडिलाने त्याच्याच मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत २० वर्षे जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यानंतर याप्रकरणात १५ लाखांचा दंडही ठोठावण्यात आला असून हि रक्कम पीडितेला देण्यात आली आहे.