मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री पूनम ढिल्लो यांच्या मुंबईतील घरी चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. या चोरीज पुनम यांच्या घऱातील अनेक महागड्या वस्तू आणि रोख रक्कमही चोरीला गेली आहे. पूनम ढिल्लो यांचा खार परिसरात फ्लॅट असून याच ठिकाणी चोरी झाली आहे. या फ्लॅटमध्ये त्यांचा मुलगा अनमोल राहतो.
पनम ढिल्लो यांच्या घरामधून १ लाख रुपयाचा डायमंड नेकलेस, ३५ हजार रुपयांची रोख आणि काही अमेरिकी डॉलर्स चोरीला गेले आहेत. पोलिसांनी चोराला ताब्यात घेतले आहे. मिडिया रिपोर्टनुसार, पूनम यांच्या घरी पेंटिंगचं काम सुरु होतं. २८ डिसेंबर ते ५ जानेवारी पर्यंत हे काम सुरु होतं. याचाच चोराने गैरफायदा घेऊन चोरी केली.
पूनम ढिल्लो यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास 'जय मम्मी दी' या चित्रपटात त्यांनी शेवटचं काम केलं. यापुर्वी ८०-९० च्या दशकात अनेक चित्रपट गाजले. पत्थर के इंसान, जय शिवशंकर, रमैय्या वस्तावैय्या, बंटवारा अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केली आहेत.