साऊथ अभिनेते अजित कुमार यांचा मोठा अपघात, रेसच्या सरावदरम्यान कार झाली क्रॅश

    08-Jan-2025
Total Views |

ajit kumar 
 
 
 
मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता अजित कुमार यांच्या बाबतीत एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. सध्या ते दुबई २४एच या कार शर्यतीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रशिक्षण घेत असून याच सरावादरम्यान त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. गाडीला झालेल्या भीषण अपघाताचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून त्यांच्या चाहत्यांध्ये खळबळ उडाली आहे.
 
अजित कुमार यांच्या कारचा अपघात होतानाच्या व्हिडिओमध्ये कार रस्त्याच्या बाजूला सुरक्षेसाठी बांधलेल्या कट्ट्याला धडकताना दिसत आहे. या धडकेनंतर गाडी जागेवर काही काळ फिरुन थोड्यावेळाने थांबली असे दिसते. सुदैवाने अजित कुमार यांना या अपघातात कुठलीही दुखापत झाली नाही आहे.
 
दरम्यान, अजित कुमार यांना पुर्वीपासूनच स्पोर्ट रेसिंगची आवड होती. त्यांनी २००० च्या दशकात रेसिंगमध्ये करियर करता यावे म्हणून अभिनयापासून ब्रेक देखील घेतला होता. आता बऱ्याच काळानंचर पुन्हा एकदा रेसिंग क्षेत्रात ते उतरले आहेत.
 
 
 
दरम्यान, अपघातानंतर अजित कुमार यांच्या तब्येतीबद्दल माहिती देताना त्यांचे मॅनेजर सुरेश चंद्रा यांनी सांगितले की, “अजित यांना कुठलीही दुखापत झाली नाही, ते पूर्णपणे बरे आहेत. ही घटना घडली तेव्हा तो १८० किलोमीटर वेगाने गाडी चालवत होते”. तसेच, अजित यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास लवकरच त्यांचा गुड बॅड अग्ली चित्रपट १० एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.