हिंदू धर्मस्थळाला भेट देणारी अभिनेत्री सारा अली खान कट्टरपंथींकडून ट्रोल
08-Jan-2025
Total Views |
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही नुतनवर्षाच्या पहिल्याच सोमवारी दि: ६ जानेवारी २०२५ रोजी श्री मल्लिकार्जुन स्वामी मंदिर येथे जाऊन दर्शन घेतले होते. यानंतर साराने सोशल मीडियावर आपला फोटो शेअर केला. त्यावर आता काही कट्टरपंथीयांनी साराच्या फोटोवर वाईट कमेंट करत तिला ट्रोल केले आहे. तिने शेअर केलेल्या आपल्या फोटोला 'सारा के साल का पहला सोमवार जय भोलेनाथ', असे कॅप्शन दिले आहे.
साराने केलेल्या पोस्टवर काही कट्टरपंथींनी तिला घेरले आहे. सारा एका हिंदू धर्मस्थळाला भेट देण्यासाठी गेल्याने कट्टरपंथींना पोटशूळ उठले आहे. यामुळे आता त्यांनी साराच्या सोशल मीडियावरील एका पोस्टवर वाईट कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
एका अब्दुल नावाच्या नेटकरी कट्टरपंथीने लिहिले की, तू तर नरकात जाशील, तसेच एका समीर नावाच्या नेटकऱ्याने साराच्या चर्चेत असलेल्या फोटोवर थुंकत असल्याचा इमोजी दाखवला आहे. तर एकाने लिहिले की, तु मुस्लिम धर्मातील नाव कशाला ठेवले आहे. तू तुझे नाव बदल, असे म्हणत त्याने सारा अली खानवर खालच्या भाषेत टीका केली आहे.
त्यानंतर एलेक्स रेहान नावाच्या कट्टरपंथी युवकाने सांगितले की, तु हिंदू आहेस का? तु हे सर्व करणे बंद कर आणि नमाज अदा कर, असे म्हणत सोशल मीडियावर सारा अली खानला कट्टरपंथींनी विनाकारण धारेवर धरले आहे.
सारा अली खानला याआधीही अशाचप्रकारे ट्रोलिंगचा समाना करावा लागला होता. ती नेहमी धार्मिक स्थळांवर जात असताना तिला अनेकदा ट्रोल करण्यात आले होते. तसेच तिला अनेकदा सोशल मीडियावर कट्टरपंथी कमेंट करत ट्रोल करत असतात.