उमेश कामतच्या आयुष्यात आलं त्याचं पहिलं प्रेम, शेअर केला खास व्हिडिओ
07-Jan-2025
Total Views |
मुंबई : मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट. आत्तापर्यंत या दोघांनी एकत्र चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये एकत्र कामं केली आहेत. सध्या देखील जर तरची गोष्ट हे त्यांचं नाटक रंगभूमीवर जोरदार सुरु आहे. दरम्यान, २०२४ या वर्षाला निरोप देत या कपलने २०२५ या नव्या वर्षाची सुरुवात अगदी दणक्यात केली आहे.
अभिनेता उमेश कामत याने नवीन वर्षाच्या सुरुवातीला नवी बाईक घेतली असून त्याच्या चाहत्यांना ही गुडन्यूज व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. उमेशने ट्रायम्प कंपनीची बाईक खरेदी केली आहे. याचा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. "हा पहिला मिनी vlog आहे. माझं पहिलं प्रेम माझ्या आयुष्यात परत आलं 🏍️♥️ भाई @korlekarmania love you 🤘🏻 And of course बायको also आजची videographer", असं कॅप्शन उमेशने या व्हिडिओला दिलं आहे.