उज्जैनमध्ये लव्ह जिहादचा पर्दाफाश! मुलीला फसवणारा 'सैफ' पोलिसांच्या ताब्यात

    07-Jan-2025
Total Views |
   
ujjain

भोपाळ : मध्य प्रदेशातील उज्जैनमधून लव्ह जिहादची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रकाश गुप्ता या बनावट हिंदू आयडीवर हॉटेलमध्ये थांबलेल्या एका मुस्लीम तरूणाला हिंदू संघटनांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. मोहम्मद सैफ अहमद असे पकडलेल्या तरुणाचे नाव आहे. हॉटेलमध्ये त्याच्यासोबत एक हिंदू तरुणीही आढळली, जी मूळची भिलाईची आहे. पोलिसांनी सैफ अहमदविरोधात एफआयआर दाखल केला आहे. ही घटना शनिवारी दिनांक ४ जानेवारी रोजी होती.

माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार सदर घटना उज्जैनमधील महाकाल मंदिराजवळील एकलव्य हॉटेलमध्ये घडली. या हॉटेलमध्ये एक मुस्लिम,हिंदू नावाने राहत असल्याची माहिती शनिवारी हिंदू संघटनांना मिळाली. माहिती मिळताच हिंदू संघटनेचे सदस्य हॉटेलमध्ये पोहोचले. येथील रजिस्टर तपासले असता प्रकाश कुमार गुप्ता एका हिंदू मुलीसोबत राहत असल्याचे आढळून आले. त्याच्याबद्दलचा संशय बळावल्याने त्याची चौकशी केली असता त्याचे खरे नाव सैफ अहमद असल्याचे समोर आले. सैफ हा छत्तीसगडमधील भिलाईचा रहिवासी आहे. त्याच्यासोबत सापडलेली तरुणीही भिलाई येथील रहिवासी असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून सैफ अहमदला ताब्यात घेतले. सदर मुलीच्या घरच्यांना सारा प्रकार कळवला असून ती आता सुरक्षित आहे. पोलीस तपासात मुलीने कबुली दिली आहे की सैफने त्याची ओळख हिंदू म्हणून करून दिली होती.

या संपूर्ण प्रकरणात हॉटेलच्या कर्मचाऱ्यांचीभूमिका सुद्धा संशयास्पद असल्याने पोलीस तपास करत आहेत. येथे सैफ अहमदने सांगितले की प्रकाश गुप्ता यांचे ओळखपत्र त्याला एका रिक्षाचालकाने दिले होते. पोलिसही या दाव्याची पडताळणी करत आहेत. सैफ अहमदविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सैफने हिंदू तरुणीला महाकालच्या दर्शनासाठी नेण्याच्या बहाण्याने उज्जैनला नेल्याचा आरोप हिंदू कार्यकर्त्यांनी केला आहे.