प्रयागराजला चला, कुंभमेळा उधळून लावा, हिंदुत्ववादी विचार संपवा
खलिस्तानी गुरपतवंत सिंग पन्नूची चिथावणी
07-Jan-2025
Total Views |
नवी दिल्ली : प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याची ( Prayagraj kumbha Mela ) तयारी सुरू आहे. दरम्यान, खलिस्तानी संघटना ’शीख फॉर जस्टिस’चा म्होरक्या गुरपतवंत सिंग पन्नू याने पुन्हा चिथावणीखोर विधान केले आहे. त्यामधून त्याने हिंदुत्ववादी विचारसरणी संपवण्याचे आवाहन केले आहे. “महाकुंभमेळ्यात अडथळा आणण्यासाठी प्रयागराज चलो,” असे त्याने म्हटले आहे. त्याबरोबरच पन्नू याने या व्हिडिओमधून विमानतळांवर समर्थकांना खलिस्तान आणि काश्मीरचे झेंडे फडणवण्यास आवाहन केले आहे. मात्र, बहुतांश लोक गुरपतवंत सिंग पन्नू यांच्याकडून दिल्या जाणार्या धमक्या या निव्वळ नाटकबाजी असल्याचे मानतात. तसेच, तो ज्या शीख समाजाचा आपण प्रतिनिधी असल्याचा दावा करतो, त्या शीख समाजाकडूनही त्याला फारसे समर्थन मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
संस्कृतीच्या रक्षणार्थ तत्पर
जे लोक अशा पोकळ धमक्या देतात, त्यांना मुळात सनातन संस्कृतीविषयी माहिती नाही. सनातन संस्कृतीमधील संतसमाज एका हातात शास्त्र, तर दुसर्या हातात शस्त्र घेऊन संस्कृतीच्या रक्षणार्थ तत्पर राहतात. इतिहासात याची अनेक उदाहरणे आहेत. जो कोणी याच्या आड आले, त्यांना योग्य वेळी योग्य धडा मिळालाच आहे. हे लक्षात घ्यावे की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीसुद्धा संत समाजातलेच आहेत.
स्वामी जितेंद्रानंद सरस्वती, राष्ट्रीय महामंत्री, अखिल भारतीय संत समिती