पाकिस्तानला मोठा झटका! इंडोनेशिया BRICS संघटनेत सामील
07-Jan-2025
Total Views |
नवी दिल्ली : पाश्चिमात्य देशांच्या मक्तेदारीला शह देण्यासाठी BRICS ही एक विकसनशील देशांची संघटना २००९ साली अस्तित्वात आली. या संघटनेच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर शांतता प्रस्थापित व्हावी, सुरक्षेच्या दृष्टीने राष्ट्रांनी एकत्र यावं असा विचार मांडण्यात आला. याच BRICS संघटनेत आता इंडोनेशिया हा देश औपचारिकरित्या समाविष्ट झाला आहे. अध्यक्षपदावर विराजमान झालेल्या देशाने ७ जानेवारी रोजी घोषणा केली.
इंडोनेशियाच्या परराष्ट्रमंत्रालयाने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार विकसनशील देशांच्या सहयोगाने प्रगतीपथावर चालण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. अध्यक्षस्थानी असलेल्या रशियाला धन्यवाद देत इंडोनेशियाने समाधान व्यक्त केले आहे. २०२३ भारताचा शेजारी असलेल्या पाकिस्तानने सुद्धा ब्रिक्समध्ये सामील होण्याची विनंती केली होती. पाकिस्तान मधील सत्ताधीश कायमच आपल्या देशाला खरे इस्लामिक राज्य असल्याचं म्हणत असतात. या आवराणाखाली कट्टरपंथीयांना पोसण्याचे काम नित्यनेमाने सुरू असते. तिथेच दुसऱ्या बाजूला इंडोनेशिया हा मुस्लीमबहुल देश आहे. परंतु प्रगतीच्या बाबतीत पाकिस्तानपेक्षा कैक पटीने पुढे आहे. सुप्तपणे दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानला ब्रिक्स देशांच्या या निर्णयमुळे चांगलाच झटका बसल्याचे बोलले जात आहे.