HMPV मुळे पुन्हा लॉकडाऊन ? जाणून घ्या नव्या व्हायरसची A to Z माहिती
07-Jan-2025
Total Views |
नवी दिल्ली : भारतामध्ये आताच्या घडीला HMPV या व्हायरसचे एकूण ७ रूग्णं आढळले आहेत. HMPV हा मोठ्या प्रमाणात लहान मुलांमध्ये आढळून आल्याचे दिसून येत आहे. बेंगलुरू, नागपूर, चेन्नाई आणि अहमदाबाद या शहरांमधील बालकांना याची लागण झाल्याचे आढळून आले आहे. केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार हा नवीन व्हायरस नसून, चिंता करण्याचे कुठलेही कारण नाही.
HMPV म्हणजे नक्की काय?
HMPV (ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस) हा एक असा विषाणू आहे ज्यामुळे श्वसन आणि सर्दीसारखे संक्रमण होते. हा आरएनए विषाणू आहे. हा विषाणू Pneumoviridae गटातील आहे. HMPV हा नवीन विषाणू नसून, त्याची पहिली केस २००१ मध्येच आढळून आली होती. नेदरलँड्समध्ये हा नवीन विषाणू म्हणून प्रथम ओळखला गेला. मात्र, गेल्या ६० वर्षांपासून हा विषाणू मानवांमध्ये असल्याचे संशोधनात आढळून आले आहे.
HMPVची लक्ष्णं काय आहेत?
HMPVने बाधित झालेल्या रूगणांना खोकला, सर्दी, ताप येतो. काही रूगणांना श्वास घेण्यास त्रास सुद्धा होऊ शकतो. HMPVचे संक्रमण हे बाधित झालेल्या रूगणांच्या संपर्कात आल्यावर या व्हायरसची लागण होऊ शकते. हवेतल्या छोट्या छोट्या बिंदुकांमुळे या व्हायरसचे संक्रमण होऊ शकतं.
HMPVमुळे कोण सर्वाधिक बाधित?
HMPVचा सर्वाधिक संसर्ग हा ५ वर्षांच्या खालच्या मुला मुलींमध्ये होतो. तर दुसऱ्या बाजूला ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाची लोकं यामुळे बाधित होतात. अमेरीकेच्या आरोग्या विभागाने केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे HMPV
ने बाधित झालेले ८१ % टक्के रूग्णं हे २ वर्षांच्या खालच्या वयोगटातील आहेत. भारतामध्ये सुद्धा १ ते दीड वर्ष या वयोगटातील शिशु हे सर्वाधिक बाधित आहेत.
Covid आणि HMPV सारखेच ?
कोविड-१९ हा २०१९ मध्ये चीनच्या वुहानमध्ये सापडलेला एक नवीन विषाणू होता, तर HMPV फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे. याव्यतिरिक्त, HMPV चा प्रसार केवळ माणसांमुळेच शक्य आहे. तर दुसऱ्या बाजूला कोविड-१९ हा विषाणू वटवाघुळातून माणसांमध्ये शिरला. HMPV ने बाधित झालेले बहुतेतक रूग्णं हे बालवयोगटातील आहे तर कोविड-१९ चे रूग्णं हे सर्व वयोगटांमध्ये नोंदवली गेली आहेत. याबाबत सर्जन अमित थधानी म्हणाले की, या विषाणूपासून शरीराचे संरक्षण करणारी प्रतिकारशक्तीही विकसित झाली आहे.
HMPV पासून बचावासाठी काय करावं ?
HMPV चे बहुतेक रूग्णं हे बालवयोगटातील असल्यामुळे त्यांच्याकडे विशेष लक्ष्य देण्याचे आवाहन केले जात आहे. लहान मुला मुलींच्या अवती भोवती वावरत असताना, हात स्वच्छ साबणाने धुवावे. घराबाहेर जात असताना मास्कचा वापर करावा. सर्दी आणि तापाची लक्ष्णं आढळल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा.
चीन सरकारने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार थंडीच्या दिवसांमध्ये अशा प्रकरचा संसर्ग होत असतो, त्यामुळे चिंता करण्याचे काही कारण नाही. चीनने लोकांच्या प्रवासावर कुठल्याही प्रकारचे निर्बंध लावलेले नाहीत.