लंडन : एकेकाळी ज्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळत नव्हता, अशा इंगलंडमध्ये आता ब्रिटीश लोकांचंच कठीण होणार आहे. पोटापाण्यासाठी गेली १० वर्ष पाकिस्तान मधून इंगलंडला राहायला आलेल्या पाकिस्तानी लोकांनी आता इंगलंड मध्ये दर्गे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी वक्फ बोर्डाने इंगलंडच्या अत्यंत आलिशान अश्या जमीनींवर दावा नोंदवला आहे. अशातच आता अल्पसंख्यांकांचं सोंग घेणाऱ्या या टोळीचं वास्तव सुद्धा जगासमोर आले आहे. ग्रुमींग गँगच्या माध्यमातून अल्पवयीन गोऱ्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या टोळ्यांचा पर्दाफाश हळू हळू होत आहे. डाव्यांच्या सहकार्यामुळे ग्रुमींग गँगच्या बातम्या कशा फेक न्यूज आहे हे वारंवार सांगितले जात होते, परंतु आता या सगळ्याची पोलखोल झाली आहे.
काही दिवसांपासून माध्यमांवर विशेष:ता एक्स हँडलवर जगभरात ग्रुमींग गँगविषयी चर्चा होताना दिसत आहे. २०१० साली पाकिस्तानी वंशाच्या ५ पुरूषांना अटक करण्यात आली. पोलिसांच्या तपासात त्यावेळी अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली होती आणि ती अशी की ह्यातील काही जणांनी चक्क १२ वर्षीय मुलीवर सुद्धा अत्याचार केला होता. इंगलंडच्या जवळपास ५० शहरांमध्ये ही टोळी कार्यरत होती. एका खाजगीत अहवालात या विषयी अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली होती. १९९७ ते २०१३ या १३ वर्षांच्या कालावधीत १४०० पेक्षा जास्त अल्पवयीन मुलामुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. २०२३ साली ऋषी सुनक यांच्या नेतृत्वात एका टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये एकूण ५५० जणांना अटक करण्यात आली होती. २०२४ साली मेयर अँडी बर्नहॅम यांच्या अध्यक्षतेखाली रोशडेल येथे २००४ ते २०१२ या वर्षांमध्ये झालेले अत्याचाराचे प्रकरण जगासमोर आले.
२०२५ या वर्षाच्या सुरूवातीला एलोन मस्क यांनी इंगलंडचे पंतप्रधान केयर स्टारमर यांच्यावर आरोप केला की त्यांनी आपल्या कार्यकाळात ग्रुमींग गँगवर कारवाई केली नाही. एक्स हँडलवर झालेल्या त्यांच्या वादानंतर ग्रुमींग गँग या विषयाबद्दलची धक्कादायक माहिती समोर आली.