"योग्य वेळी योग्य उत्तर देणार"; सुरेश धस यांच्याकडून होणाऱ्या आरोपांवर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

    07-Jan-2025
Total Views |
 
dhananjay munde
 
मुंबई : (Dhananjay Munde) बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी व सत्ताधारी आमदारांकडून केली जात आहे. आमदार सुरेश धस यांच्याकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर वारंवार आरोप करण्यात येत आहेत. यासंदर्भात आमदार धसांकडून होणाऱ्या आरोपांवर मंत्री मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
"योग्य वेळी योग्य उत्तर देणार" 
 
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी धनंजय मुंडे मुंबईत दाखल झाले आहेत. यावेळी माध्यमांनी आमदार सुरेश धस यांनी केलेल्या आरोपांविषयी प्रश्न विचारल्यावर, "योग्य वेळी योग्य उत्तर देणार" अशी संकेतात्मक प्रतिक्रिया दिली आहे. तसेच धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र धनंजय मुंडेंनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेनंतर राजीनामा दिल्याच्या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. यावेळी माध्यमांनी राजीनामाबाबत प्रश्न विचारल्यावर, "मी काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही", असं धनंजय मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितले.