अजय देवगणची घोड्यासोबत एन्ट्री, 'आझाद'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

    07-Jan-2025
Total Views |

azaad  
 
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ॲक्शन अभिनेता अजय देवगणचा ‘सिंघम अगेन’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता पुन्हा एकदा नव्या वर्षात अजय देवगण ‘आझाद’ चित्रपटातून नव्या भूमिकेत येणार आहे. या चित्रपटात कलाकारांसोबतच घोडा हे विशेष आकर्षण असून आझाद चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाच्या सोहळ्याला घोड्यासोबत कलाकारांनी एन्ट्री केली होती. कारण, या चित्रपटात घोडा फार महत्वाची भूमिका निभावणार आहे. अजय देवगण यात घोडेस्वाराची भूमिका साकारणार आहे.
 
'आझाद' चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली असून या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूर यांनी केले आहे. 'आझाद' चित्रपट हा १७ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय देवगणचा नवीन वर्षातील हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटातून राशा थडानी आणि अमन देवगण बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.