पुण्यात उबाठा गटाला दणका! पाच नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
07-Jan-2025
Total Views |
मुंबई : उबाठा गटाचे पुण्यातील नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. मंगळवारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत याबाबातची माहिती दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या तोंडावर उबाठा गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार आहे. मंगळवारी दुपारी १ वाजता मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडेल.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "आज १ वाजता उबाठा गटाचे पुण्यातील पाच नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे पक्षाची ताकद वाढणार आहे. समाजातील उत्फुर्त कार्यकर्ते सरकारच्या योजना गरीब माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि महाराष्ट्राला मदत करण्यासाठी आमच्या पक्षात आले तरी आम्ही त्यांना पक्षात घेऊन मुख्य धारेत घेऊ," असे त्यांनी सांगितले.