तर्पण युवा पुरस्कार! युवांचा होणार सन्मान

    07-Jan-2025
Total Views |
 
tarpan
 
मुंबई : तर्पण फाऊंडेशन तर्फे ‘तर्पण युवा पुरस्कार सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. सोमवार १३ जानेवारी रोजी ‘एस. एन. डी. टी. महाविद्यालय, चर्चगेट’ येथे सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि बदल घडवून आणणाऱ्या युवांचा सन्मान या सोहळ्यात केला जाणार आहे.
 
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि विशेष अतिथी म्हणून महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे उपस्थित राहणार आहेत. सोबतच एस. एन. डी. टी. महिला विद्यापिठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव, कोहिनूर ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, वॉकहार्ट लिमिटेडचे कार्यकारी संचालक डॉ. हुजैफा खोरकीवाला आणि इस्कॉनचे नित्यानंद चरण दास आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत.