"भगवद्गीतेत श्रीकृष्णाने सांगितलंय की.."; रविना टंडनच्या लेकीचं राशाचं नेटकऱ्यांनी केलं कौतुक

07 Jan 2025 15:39:50

rasha 
 
 
मुंबई : अभिनेता अजय देवगण याची प्रमुख भूमिका असणारा ‘आझाद’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटात त्याचाच पुतण्या अमन देवगण आणि रविना टंडन हिची मुलगी राशा चित्रपटात झळकणार आहे. दरम्यान, नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यावेळी रवीनाची लेक राशा थडानीने भगवद्गीतेचा संदर्भ देऊन केलेलं वक्तव्य सध्या सोशल मीडियावर खास चर्चेत आहे.
 
'आझाद' च्या ट्रेलर सोहळ्याला राशा थडानीने मीडियाशी संवाद साधताना भगवद्गीतेचा खास संदर्भ देत म्हटले की , "माझ्या आईने मला एकदा सांगितलेलं. भगवद्गीतेत लिहिलंय की, तुम्ही फक्त खूप मेहनत करा. प्रत्येक कामात तुमचं बेस्ट द्या. पुढे जे काय होईल ते देवावर आहे. या इंडस्ट्रीत इमोशनल अटॅचमेंट खूप आहे. अतीविचार आणि अनिश्चितता खूप आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येकाचं ऐकत बसाल तर कायम चिंताग्रस्त राहाल. त्यामुळे तुम्ही खूप मेहनत करा, तुमचं बेस्ट द्या त्यानंतर देव सर्व काही नीट करेल."
 
दरम्यान, भगवद्गीतेचा उल्लेख राशीने केल्यामुळे नेटकऱ्यांनी तिचं खास कौतुक केलं आहे. काही नेटकरी म्हणाले की, "याला म्हणतात अभिनेत्री", "अभिनेत्री असावी तर अशी!" राशा-अमन-अजय देवगण यांचा ‘आझाद’ हा चित्रपट १७ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0