कर्नाटकच्या श्रीरंगपट्टणातील ७० हून अधिक मालमत्तांवर वक्फचा दावा

    07-Jan-2025
Total Views |

Karnatak Waqf Board News
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Karnataka Waqf Board News) कर्नाटकातील वक्फ बोर्ड राज्यातील ऐतिहासिक शहर श्रीरंगपट्टणातील ७० हून अधिक मालमत्तांवर आपला दावा ठोकल्याचे निदर्शनास आले आहे. यात सरकारी मालमत्ता, शेतकऱ्यांच्या जमिनी आणि ऐतिहासिक वास्तूंचा समावेश असल्याची माहिती आहे. यामध्ये टिपू सुलतान शस्त्रागार सारख्या वास्तूंचा समावेश आहे. याशिवाय एएसआय आणि राज्य पुरातत्व विभाग, संग्रहालय आणि वारसा विभागाच्या अंतर्गत समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांच्या बांधकाम आणि जमिनींची आरटीसी जमीन रेकॉर्डमध्ये वक्फ बोर्ड मालमत्ता म्हणून नोंद करण्यात आली आहे. यामध्ये पुरातत्व, वस्तुसंग्रहालय आणि हेरिटेज विभाग, श्री चामराजेंद्र मेमोरियल शासकीय संग्रहालय आणि श्रीरंगपट्टणातील इमारतींची वक्फ मालमत्ता म्हणून नोंद करण्यात आली आहे.

हे वाचलंत का? : 'विद्या भारती'च्या शाळेतही आता सीबीएसईचा अभ्यासक्रम

धक्कादायक बाब म्हणजे महादेवपुरा गावातील चिकम्मा चिक्कादेवी मंदिर आणि चंदगालू गावातील सरकारी शाळेवरही वक्फ बोर्डाने आपला दावा ठोकला आहे. स्टार ऑफ म्हैसूरच्या अहवालानुसार, तहसीलमधील सर्वेक्षण क्रमांक १७, २८, ६३, ६८ आणि ७३ असलेली मालमत्ता, ज्यांची आधी राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाच्या आरटीसीमध्ये नोंदणी करण्यात आली होती, त्यांची देखील वक्फ मालमत्ता म्हणून नोंदणी करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर शहरातील २० गुंठे सरकारी जमीन आता सर्व्हे क्रमांक ७५८ अंतर्गत 'सरकारी घर' म्हणून नोंदवण्यात आली आहे. वक्फ बोर्डाच्या या मनमानीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या असून पीडितांनी वक्फ बोर्डासोबत कायदेशीर लढाई लढण्याची पूर्ण तयारी केली आहे.